Share

PFI : राज्यात पीएफआय कार्यकर्त्यांना दिलं जात होतं दहशतवादी प्रशिक्षण? एटीएसचा धक्कादायक खुलासा

PFI

PFI : राज्यात पीएफआयबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात पीएफआय कार्यकर्त्यांकडून शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्यांनतर आता ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.

पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय सरकारला आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा एनआयएने पीएफआयच्या कार्यालयांवर छापे टाकले. त्यांनतर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांची बंदीही घातली.

त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसच्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. पीएफआयच्या अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी एक खुलासा केला आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे ट्रेनिंग दिले असल्याची माहिती एटीएसच्या तपासातून पुढे आली आहे.

तसेच या आरोपींच्या बँक खात्यातून अनेक मोठे व्यवहार झाले असल्याचा दावाही एटीएकडून करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप आणि हार्डडिस्क जप्त करण्यात आली आहे. औरंगाबाद, बीड आणि इतर काही ठिकाणी दहशतवादाचे ट्रेनिंग देण्यात येत असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

एका बंद खोलीत हे ट्रेनिंग देण्यात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या पाच आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी कोणत्या आरोपीकडे कोणती जबाबदारी देण्यात आली होती ही माहिती एटीएसने दिली आहे.

या आरोपींपैकी शेख इरफान हा पीएफआयचा माजी जिल्हा उपाध्यक्ष असून राज्य कमिटीचा सदस्यसुद्धा आहे. त्याच्या बँक खात्यांमध्ये लाखोंचे व्यवहार झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच परवेज खान हा एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रशिक्षण देत असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले आहे.

अब्दुल हमीद याच्याकडे विद्रोही विचार पसरवण्याची जबाबदारी असून त्याच्याकडे एक १९ पानांचे पुस्तकदेखील सापडले आहे. नासेर खान हसन या आरोपीच्या इशाऱ्यावर सर्वजण मराठवाड्यात कार्यरत होते. तसेच त्याच्या बँक खात्यात १ लाख ८० हजार रुपयांचा व्यवहार झाला असल्याचेही एटीएसने सांगितले आहे.

सय्यद फैजल हा आरोपी केरळमधून प्रशिक्षण घेऊन आला असून त्याच्यावर देशविरोधी कटासाठी आवश्यक शारीरिक प्रशिक्षणाची जबाबदारी होती. त्याच्या बँक खात्यामध्येदेखील अनेक व्यवहार झाला असल्याची माहिती एटीएसने न्यायालयाला दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
PFI : PFI नंतर या इस्लामिक संघटनेवरही बंदी घालणार, शिंदे-फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय
Eknath Shinde : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या लोकांना PFI वरील बंदीनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान!
Raj thackeray : जेव्हा जेव्हा अशी कीड तयार होईल तेव्हा अमित शाहांना टॅग करत राज ठाकरेंची प्रतिक्रिया
raj thackeray : पुण्यात पाकीस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर राज ठाकरे भडकले; मोदींकडे केली ‘ही’ मागणी

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now