अंबानींच्या घराबाहेर सँडविच खाणाऱ्या सचिन वाझेंवर संतापले एटीएसचे अधिकारी

मुंबई | उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या कारमध्ये मुकेश अंबानींच्या परिवाराला मारण्याची धमकी दिल्याचं पत्र आणि स्फोटके सापडली होती. घटनेची माहिती मिळताच एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.

मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे हे सुध्दा अंबानींच्या घराबाहेर स्फोटके सापडल्याने तेथे गेले होते. त्यावेळी सचिन वाझे यांच्यासोबत चर्चा करायची असल्याने एटीएसचा अधिकारी वाझेंकडे गेला. त्याने सचिन वाझे यांना स्फोटकांची कार कुठे आहे? असा सवाल विचारला.

सचिन वाझे यावेळी सँडविच खात बसले होते. सचिन वाझे यांनी अधिकाऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मग एका पोलिस कर्मचाऱ्याला वाझेंनी स्फोटकांची कार साहेबांना दाखव असा आदेश दिला.

सचिन वाझे यांच्या या बेजबाबदार वर्तणामुळे एटीएसचा अधिकारी चांगलाच त्यांच्यावर भडकला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे सचिन वाझे यांनी नियमांचे पालन केले नसल्याची तक्रार केली असल्याची माहिती पुढे येत आहे.

मनसुख हिरेन आणि स्फोटकांनी भरलेल्या कारच्या प्रकरणात सचिन वाझे यांच नाव समोर आलं आहे. त्यांना एनआयएने २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एनआयएकडून चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत.

अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचाच हात असल्याचं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग; आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल
देवेंद्र फडणवीस ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’ म्हणणाऱ्या गोपीचंद पडळकरांना लोकांनी धु धु धुतले
एमपीएससीची परीक्षा झालीच पाहीजे; रोहीत पवारांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात थोपटले दंड
अन् गृहराज्यमंत्र्यांनी छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यावरचं घातला मुजरा

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.