तारक मेहता मधील आत्माराम भिडेंनी धरली गावाकडची वाट, व्हिडिओ शेअर करत म्हणाले…

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सगळीकडे लोकप्रिय आहे. नुकतेच या मालिकेने १२ वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.

मालिकेतील प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे. तसेच या पात्रांमुळे जे कलाकार या पात्रांना निभावतात त्यांना देखील खऱ्या आयुष्यात एक वेगळी ओळख मिळाली आहे. याच मालिकेतील एक पात्र म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच अभिनेता मंदार चांदवडकर.

अभिनेता मंदार चांदवडकर हे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून बऱ्याच दिवसातून वेळ काढत नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या मुळगावी गेले आहेत. त्यांनी सोशल मिडियावर शेतातील व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मिडियावर भिडे मास्तरचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटले की, मी माझ्या मुळगावी नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये, बारा ज्योतिर्लिंगांपैकी असं एक पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे आणि मी इथे येऊन खुप प्रसन्न झालो आहे. कामातून वेळ काढत फिरायला आलो आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून इथं शांत वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंदार चांदवडकर यांनी भिडे मास्तरची भूमिका निभावली आहे. त्यांनी ही भूमिका इतकी चांगली निभावली आहे की, खऱ्या आयुष्यातही त्यांना भिडे म्हणूनच ओळख मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांपासून दिलासा मिळणार, लवकरचं स्वदेशी पेट्रोल-डिझेल येणार
करिना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची झाली आहे ‘अशी’ अवस्था; घर चालवण्यासाठी करते ‘हे’ काम
खुशखबर! फास्ट टॅगमध्ये पैसे असतानाही स्कॅन झाला नाही तर पैसे देऊ नका, वाचा नवा नियम

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.