बापरे! एका ट्रान्जेक्शनसाठी बँक तुमच्याकडून तब्बल ‘इतके’ रुपये आकारते; जाणून घ्या हे पैसे कसे वाचवता येईल

सध्याच्या काळात प्रत्येक माणूस कॅशलेस राहण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सध्या एटीएमचा वापर पण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पण तुम्हाला माहितीये का? की तुम्ही कितीवेळा एटीएमएममधून मोफत पैसे काढू शकतात आणि त्यानंतर बँक तुम्हाला किती पैसे चार्ज करते.

महिन्याला पाच ट्रान्जेक्शन मोफत असतात, असा गैरसमज सध्या सगळीकडे आहे, पण हे चुकीचे आहे. सध्या बँका ग्राहकांना कॅश आणि नॉन कॅश असे पाच ट्रान्जेक्शन मोफत देत असतात. पण हे व्यवहार तेव्हाच मोफत असतात, जेव्हा तुम्ही त्याच बँकेचे एटीएम वापतात, ज्या बँकेत तुमचे खाते आहे.

अशात सहाव्या व्यवहारासाठी मात्र बँक पैसे आकारते. बँक ही सहाव्या व्यवहारासाठी २० रुपये आकारते. तसेच ही शुल्क आता १ जानेवारी २०२२ पासून २१ रुपयांवर जाणार आहे. तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये तुम्हाला तीन ट्रान्जेक्शन मोफत करता येतात. यावर बँक कुठलाही एटीएम चार्ज लावत नाही.

असे असले तरी हे ट्रान्जेक्शन मेट्रो शहरांनाच लागू असतात. मेट्रो शहराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल तर तिथे तुम्ही दुसऱ्या बँकेतून पाच ट्रान्जेक्शन मोफत करु शकतात. त्यानंतर तुम्हाला ट्रान्जेक्शनला चार्ज केले जातात.

पाच ट्रान्जेक्शननंतर प्रत्येक बँक २० रुपये चार्ज लावते. म्हणजेच एका महिन्यातले तुमचे पाच विनामुल्य ट्रान्जेक्शन संपले तर बँक तुमच्या पुढच्या प्रत्येक ट्रान्जेक्शनवर २० रुपये चार्ज करण्यास सुरुवात करते. अशात जर तुम्हाला १०० रुपये रक्कम काढायचे असेल, तर तुम्हाला ते परवडणारे नाही.

तसेच हे झालं कॅशचं. आता येऊ या नॉन कॅश वर म्हणजेच तुम्ही कॅश विथड्रॉल सोडून जेव्हा तुम्ही दुसरे ऑप्शन निवडता, त्यामध्ये बँलन्स चेक, स्टेटमेंट प्रिंट काढणे, हे पाच ट्रान्जेक्शन तुम्हाला मोफत भेटतात. त्यानंतर तुम्हाला या ट्रान्जेक्शनसाठी पाच रुपये आकारले जातात. आता येत्या १ ऑस्टपासून हे चार्जेस सहा रुपये होणार आहे.

बँकेने हे चार्जेस का वाढवले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया. सध्या एटीएमच्या देखभालीचा खर्च वाढत चालला आहे. विजेचे बील वाढत चालले आहे, त्यामुळे बँकांना आता एटीएमचा खर्च परवडेनासा झाला आहे, त्यामुळेच आरबीआयने हे चार्जेस लावले आहे.

तसेच असे चार्जेस लावल्याने रोखीचे व्यवहार कमी होतील आणि डिजिटल व्यवहाराला चालना मिळेल,असे आरबीआयने म्हटले आहे. तसेच रोखीच्या व्यवहारामुळे काळा पैशाच्या व्यवहारही केले जातात.

सलुन, किराणा, दवाखाने याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार केले जातात, त्यामुळे काळा पैसा जन्माला येत असतो. त्यामुळे डिजिटल पेमेंटमुळे काळ्या पैशाच्या व्यवहाराला अटकाव केला जाऊ शकतो.

अशात तुम्ही हे जाणून घेऊया की हे चार्जेस कसे टाळता येईल. त्यासाठी तुम्ही जर एकसोबत ठरावीक रक्कम काढून ठेवता येईल, ज्यामुळे तुम्हाला जास्त ट्रान्जेक्शन करण्याची गरज पडणार नाही. तसेच ज्या ज्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट शक्य होईल, त्याठिकाणी ऑनलाईन पेमेंट केला पाहिजे.

ज्या ठिकाणी तुम्हाला बारकोड दिसत असले, मग त्या फळभाज्यांची दुकाने असो, रिक्षावाला असो, किराणा, किंवा अजून कुठल्याही ठिकाणी ऑनलाईन पेमेंट केला पाहिजे. गृहीणी बऱ्याचदा व्यवहारासाठी रोख रक्कम वापरत असतात, त्यामुळे गृहिणी ऑनलाईन पेमेंट करु शकतात.

महत्वाच्या बातम्या-

दुर्दैवी! बहिणीने भावासाठी केलं होत यकृत दान, शस्त्रक्रियेनंतर भावाचा मृत्यू
सर्वांना खळखळून हसवणाऱ्या भुवन बामवर कोसळला दु:खाचा डोंगर; कोरोनामुळे गमावले आई-वडिल
कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण…; तज्ञांनी मोदींना सोपवला महत्वाचा रिपोर्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.