Share

Atharva Sudame : अथर्व सुदामेला PMPL कडून थेट कायदेशीर नोटीस, रील काढणं महागात पडलं; नेमकं काय केलं?

Atharva Sudame : सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला इन्स्टाग्राम एन्फ्लुएंसर अथर्व सुदामे (Atharva Sudame social media influencer) सध्या मोठ्या वादात अडकला आहे. सार्वजनिक बसमध्ये चित्रीकरण करून रील तयार करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. पुणे (Pune city) येथील पुणे महानगर परिवहन महामंडळ पीएमपीएमएल (Pune) यांच्या बसमध्ये विनापरवानगी शूटिंग केल्याप्रकरणी त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना तयार केलेल्या या रीलमध्ये अधिकृत गणवेश, ई-मशिन आणि बॅच बिल्ला यांचा अनधिकृत वापर झाल्याचा आरोप आहे. याशिवाय रीलमध्ये एका महिला प्रवाशाचं अपमानास्पद चित्रण केल्याचा आक्षेप प्रशासनाने घेतला असून, त्यामुळे सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पीएमपीएमएलची आक्षेपांची यादी

महामंडळाने पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की, कोणतीही लेखी परवानगी न घेता बसमध्ये शूटिंग करणं हे अंतर्गत नियमांचं उल्लंघन आहे. रीलमधील दृश्यांमुळे महिला प्रवाशांच्या सन्मान आणि मानसिक सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या हक्कांना धक्का बसतो, तसंच महामंडळाची प्रतिमा मलिन होते, असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे.

रील हटवण्याचे आदेश

प्रशासनाने संबंधित रील तात्काळ इन्स्टाग्रामवरून हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. भविष्यात महामंडळाच्या बस सेवा, कर्मचारी किंवा साहित्याशी संबंधित कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा रील प्रसिद्ध करण्याआधी सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणं बंधनकारक असल्याचंही बजावण्यात आलं आहे.

सात दिवसांत खुलासा नाही दिल्यास कारवाई

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत मुख्य कार्यालयात लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत खुलासा न केल्यास किंवा रील हटवण्यात कसूर केल्यास प्रचलित कायदे व नियमांनुसार पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now