Share

Asim Sarode On Atharva Sudame: अर्थव सुदामे, तुझं तर राज ठाकरेंनी कौतुक केलं होतं, घाबरतो कशाला, व्हिडीओ डिलीट केल्यानंतर असीम सरोदे यांनी दिला पाठींबा

Asim Sarode On Atharva Sudame : प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे (Atharva Sudame) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याने शेअर केलेल्या एका रिलवरून हिंदुत्ववादी गटांकडून जोरदार विरोध होत आहे. या विरोधामुळे अथर्वने तो व्हिडिओ डिलीट केला; मात्र याच निर्णयावर नामांकित वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी खुल्या शब्दांत अथर्वच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे.

असीम सरोदे यांची भूमिका

असीम सरोदे (Asim Sarode) यांनी फेसबुकवरून लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अथर्व सुदामे घाबरून व्हिडिओ डिलीट करतो, हे योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेले टुकार हल्ले रोखण्यासाठी ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. अथर्वने सातत्याने रील्स करून स्वतःचा मार्ग तयार केला, त्याचा आदर व्हायला हवा. त्याच्या काही विनोदांचा दर्जा उथळ किंवा पांचट वाटला तरी ते अश्लील नव्हते. धमक्यांना घाबरून त्याने इतका सुंदर आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा व्हिडिओ काढणं चिंताजनक आहे.”

राज ठाकरेंचं कौतुक, आता मनसेने साथ द्यावी?

सरोदे यांनी पुढे लिहिलं, “राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकदा अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं. त्यानंतर त्याने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले. आज काही धर्मवादी गट अथर्वला धमक्या देत आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ने त्याच्या पाठीशी उभं राहावं, अशी माझी राज ठाकरे साहेबांशी चर्चा झाली आहे. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा, कोण काय करतोय ते आपण पाहूया.”

वादग्रस्त व्हिडिओचा मुद्दा काय?

अथर्व सुदामे (Atharva Sudame) याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक रिल शेअर केली होती. यात तो गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत आत येतो. मूर्तीकार संभ्रमात पडतो; पण अथर्व ठामपणे सांगतो की, मूर्ती तुमच्याकडूनच घ्यायची आहे. त्याच वेळी अथर्वचा संवाद असा असतो – “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही… तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” याच संवादावरून काही हिंदुत्ववादी गटांनी त्याच्यावर टीका केली. त्यामुळे दबावाखाली अथर्वने तो व्हिडिओ डिलीट केला.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now