VIDEO: “इस्त्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी आधी वाजपेयींचे हे भाषण ऐका”

इस्त्रायलमध्ये सध्या अतिशय भीषण युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी येथील दहशतवादी संघटना हमासमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. गाझा या पट्टीमध्ये मोठे रॉकेट हल्ले पण सुरु आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे दिसून येत आहे.

असे असताना भारत सरकारनेही या वादामध्ये आपली भुमिका मांडली आहे. मात्र भारत सरकारच्या भुमिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एका भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.तसेच भाजपप्रणित केंद्र सरकारला वाजपेयींचे भाषण ऐकण्याचा सल्ला दिला आहे.

आज इस्त्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी आपल्या वडिलांसमान असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांचे हे भाषण ऐकून घ्यावे. “इस्त्रायलने आक्रमण करुन अरबांच्या जमिनीवर आक्रमण केले आहे. त्यांना पॅलेस्टीनींची जमीन सोडावी लागेल- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जर भाजपाचे सरकार आले, तर ते अरबांची साथ देणार नाही, इस्त्रायलचा साथ देईल. मोरारजी देसाईंनी हे स्पष्ट केले आहे. पण गैरसमज दुर करण्यासाठी मी हे स्पष्ट करतो की, आम्ही प्रत्येक मुद्याला गुण आणि दुर्गुणांच्या बाजूने पाहू. पण मध्यपुर्वेच्या बाबतीत हे स्पष्ट आहे की अरबांच्या जमीनीवर इस्त्रायलने अतिक्रमण केलय, त्यांना ती जमिन सोडावीच लागले, असे वायपेयी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

तसेच ही आक्रामक भुमिका आम्हाला आच्या संबंधांमध्ये स्विकार नाही. जो नियम आमच्यावर लागू आहे, तो नियम इतरांनाही लागू आहे. अरबांची जमिन खाली झाली पाहिजे. पॅलेस्टीनींच्या अधिकाऱ्यांची स्थापना झाली पाहिजे. मध्यपुर्वेच्या समस्येवर असा तोडगा काढला पाहिजे, जो आक्रमण संपुष्टात आणेल आणि शांती प्रस्थापित करेल, असेही या व्हिडिओमध्ये अटल बिहारी वाजपेयी म्हणताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजकारणातला देवमाणूस गेला; राजीव सातवांबद्दल बोलताना मंत्री वडेट्टीवार ढसाढसा रडले
खूपच कमी भांडवलावर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, आणि दरमहा लाखो कमवत वर्षात व्हाल १ कोटींचे मालक
मी संसदेतील चांगला मित्र गमावला; राजीव सातव यांच्या जाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.