एवढ्याश्या लहान वयात तैमुर करतोय पैसे लुटण्याच्या बाता; स्वतः सैफअली खाननेच केलं उघड..

‘बंटी और बबली 2’ रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचवेळी चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसणार आहेत. चित्रपटाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे.

सैफ अली खान आणि राणी मुखर्जी तब्बल १३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी गप्पा मारत आहेत. यामध्ये दोघेही त्यांचे चित्रपट, बाँडिंग आणि मुलांबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे.

सैफ अली खानने तैमूरबद्दल खुलासा करताना सांगितले की, अजय देवगणचा ‘तान्हाजी’ रिलीज झाल्यानंतर तैमुरवर वेगळाच परिणाम झाला आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटातील सैफची भूमिका पाहून तैमुर रागाच्या भरात बनावट तलवार घेऊन लोकांच्या मागे धावत असे. सैफ अली खानची ही चर्चा ऐकून राणी मुखर्जीला हसू आवरता आले नाही.

सैफ अली खान म्हणाला की, मी त्याला नेहमी समजावत असतो की चित्रपटात तो एक वाईट माणूस होता आणि ही फक्त एक भूमिका आहे. सैफ अली खान म्हणाला की, तैमूरला पटवूनही तो म्हणतो, “मला वाईट मुलगा व्हायचे आहे. मला बँक लुटायची आहे आणि मी सर्वांचे पैसे चोरणार आहे.”

सैफचे म्हणणे ऐकून राणी मुखर्जी म्हणाली की तो वेगळ्या दिशेने जात आहे. यावर सैफ अली खान म्हणतो, हा त्याचा एक विचार आहे पण हो.. मी त्याला त्याच्या आईकडे सोपवतो की तू सांभाळ.

तैमूर हा सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा आहे. या वर्षी करीना कपूर खानने तिचा दुसरा मुलगा जेहला जन्म दिला. त्याचवेळी राणी मुखर्जीने अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, तिचे आणि सैफ अली खानचे बॉन्डिंग कालांतराने चांगले झाले आहे.

सैफही आता चांगल्या अर्थाने बदलला आहे. आता ती सैफसोबत पालकत्वावर बोलते. ‘बंटी और बबली 2’ शुटींगदरम्यान राणी मुखर्जी म्हणाली की, तिच्या आणि सैफ अली खानच्या बहुतेक चर्चा तैमूर आणि आदिराशी संबंधित आहेत.

१९ नोव्हेंबरला ‘बंटी और बबली 2’ रिलीजसाठी सज्ज झाला असून प्रेक्षकही या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत. तसेच अनेक वर्षानंतर एकत्र काम करणारी सैफ आणि राणीची जोडी पडद्यावर काय धमाल करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या
समीर वानखेडेंनी आपल्या पहिल्या पत्नीलाही नाही सोडले, मलिकांचा आणखी एक खळबळजनक आरोप
ज्ञानदेव वानखेडे हिंदूच; क्रांती रेडकरने समीर वानखेडेंचा जन्मदाखलाच दाखवला
खरंच मुख्यमंत्री शिवराज सिंहांना मोदींच्या फ्रेममध्ये येण्यापासून रोखलं? जाणून घ्या सत्य..
नावावर ११७ पावत्या तरी बिंधास्त चालवत होता गाडी, पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर भरावा लागला ‘इतका’ दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.