Share

इफ्तार पार्टीत ‘या’ व्यक्तीने सलमान खानला बळजबरीने केला किस, व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण

नुकतंच बाबा सिद्दीकी यांच्या यांच्या घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान(Salman Khan) देखील या पार्टीला हजर होता. या इफ्तार पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(At Iftar party, ‘Yaa’ person forcibly kisses Salman Khan)

यामधील एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये बाबा सिद्दीकी अभिनेता सलमान खानला किस करताना दिसत आहे. यावर सलमान खान व्हिडिओमध्ये हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ वूप्लाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, बाबा सिद्दीकी अभिनेता सलमान खानला त्याच्या कारपर्यंत सोडायला येतात. त्यानंतर अभिनेता सलमान खान त्याच्या कारमध्ये बसतो. त्यावेळी बाबा सिद्दीकी कारच्या खिडकीतून आत जाऊन सलमान खानला मिठी मारतात. तसेच अभिनेता सलमान खानला किस देखील करतात.

बाबा सिद्दीकीच्या या कृतीनंतर अभिनेता सलमान खान हसतो आणि स्वतःला त्यांच्यापासून दूर करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत म्हंटले आहे की, “इतकेच पाहणे बाकी होते”. तर दुसऱ्या युजरने कमेंट करत म्हंटले आहे की, “बाबा स्वस्त नशा करून आले आहेत.”

बाबा सिद्दीकीच्या या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. सलमान खानचे वडील सलीम खान, सोहेल खान, अरबाज खान आणि अलवीरा खान देखील या पार्टीला हजर होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान देखील या पार्टीला पोहचला होता. २०२१ सालची मिस युनिव्हर्स सिंधू देखील या पार्टीला उपस्थित होती.

याशिवाय अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री आमना शरीफ, रश्मी देसाई आणि उर्वशी ढोलकिया यांनी बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीला हझेरी लावली होती. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनीस बज्मी देखील या पार्टीला उपस्थित होते. अभिनेत्री कतरिना कैफ देखील या इफ्तार पार्टीला आली होती. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी देखील या इफ्तार पार्टीला हजर होती.

महत्वाच्या बातम्या :-
बोलताना भान ठेवा, देशात लोकशाही आहे पेशवाई नाही; मोदींच्या मंत्र्याने राज ठाकरेंना सुनावले
भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास विरोध; म्हणाले, त्यांनी अनेकदा भूमिका बदलल्या…
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजलने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now