अश्विनच्या धडाकेबाज शतकानंतर बायकोने केलेल्या ट्विटमुळे टीकाकार झाले गार, म्हणाली…

चेपॉकच्या ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ आणि इंग्लडच्या मायकेल वॉघन यांनी टीका केली होती त्याच विकेटवर अश्विनने धमाकेदार शतक झळकवले. त्याने हे शतक झळकवून टीकाकारांची तोंडे बंद केली.

पहिल्या डावात अश्विनने आपल्या फिरकी गोलंदाजीने इंग्लडच्या खेळाडूंना नाकी नऊ आणले होते. वॉ आणि वॉघन यांनी टीका केली होती की, कसोटीसाठी अशा प्रकारची खेळपट्टी आजिबात मान्य नाही.

यानंतर क्रिकेटच्या काही जाणकारांनी त्यांना उत्तर दिले होते की खेळपट्टी अगदी योग्य आहे. पण तरीही भरपूर टीका होत होती. त्यातल्या त्यात इंग्लडच्या क्रिकेटपटूंकडून खुप टीका होत होती.

चेपॉकच्या खेळपट्टीने पहिल्या सामन्यापासूनच फिरकी गोलंदाजांना साथ दिली आहे. अश्विनने जेव्हा अर्धशतक ठोकले तेव्हा त्याच्या पत्नीला राहावले गेले नाही. त्याची पत्नी प्रिथी अश्विन हिने एक ट्वीट केले आणि टिकाकारांची तोंडे बंद केली. तिने ट्वीट केले की, माझा नवरा प्रत्येकाला ट्रोल करतो आहे. #win50 असे तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पहिल्या डावातच अश्विनने इंग्लडचा अर्धा संघ तंबूत पाठवला होता. खेळपट्टी गोलदाजांसाठी अनुकूल असल्यामुळे अश्विनने त्याचा लाभ उठवला आणि इंग्लडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते.

https://twitter.com/prithinarayanan/status/1361216097383567362?s=20

महत्वाच्या बातम्या
व्हॅलेंटाईटन डे दिवशी जुळल्या रेशीमगाठी; बिग बॉसच्या घरात आणखी एक जोडी जुळली
सर्वसामान्यांचा महिन्याचा खर्च वाढणार, घरगुती सिलेंडरच्या भावात मोठी वाढ
जाणून घ्या ‘लाडाची मी लेक गं’ मालिकेतील मम्मी म्हणजेच स्मिता तांबेचा अभिनय क्षेत्रातील प्रवास
स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.