पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदीच, जाणून घ्या पाच राज्यात कोणाला कुठे मिळणार सत्ता

नवी दिल्ली | पश्चिम बंगालसह चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रेदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेचे निकाल समोर आले आहेत. यानुसार आसाम वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपाचा मोठा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या चार राज्यांमध्ये घेतलेला सर्वे प्रसिध्द केला आहे. यानुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसी, तमिळनाडूमध्ये यूपीए, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये एनडीए तर केरळ राज्यात एलडीएफचे सरकार येण्याचा अंदाज आहे.

सर्वेनुसार भाजपाने पश्चिम बंगालमध्ये पुर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याठिकाणी मतदारांनी ममता यांच्या टीएमसी सरकारला पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. परंतु राज्यात अनेक जागांवर भाजपाला विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये टीएमसीला २९४ पैकी १५४ जागा तर भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.

सर्व्हेनुसार केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. एलडीएफला एकूण १४० जागांपैकी ८२ जागांवर विजय मिळण्याची  शक्यता आहे. तर युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ५६ जागांपर्यंत मजल मारू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय भाजपला केरळमध्ये फक्त एक जागा मिळेल अशी शक्यता आहे.

तमिळनाडू राज्यात सत्ता पालटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये डीएमकेच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला १५८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्नाद्रमुखच्या नेतृत्वाखालील आघाडीला ६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय एनडीएला १६ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजपासाठी आनंदाची बातमी आसाम राज्यातून आली आहे. आसाममध्ये भाजपाची पुन्हा सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याठिकाणी १२६ जागांपैकी एनडीएला ६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यूपीएच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
“राज ठाकरेंना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा आदेश पाळायचा नसेल”- रामदास आठवले
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारले, प्रकल्पग्रस्तांची घेतली भेट
फडणवीस म्हणतात, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दहा रूपयांनी महाग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.