‘ते’ एक वाक्य बोलल्यामुळे झाली मनसुख हिरेन यांची हत्या

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून काढून घेत राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे देण्यात आला आहे.

मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीची कार अंबानीच्या घराबाहेर सापडली होती. यानंतर मुंब्राच्या खाडीत मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. एनआयएने अंबानीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी सचिन वाझेला अटक केली आहे

मनसुख हिरेनची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनी पतीची हत्या केली असल्याची तक्रार दाखल केली होती. सचिन वाझेने पतीला या प्रकरणात अटक हो, याचा तपास माझ्याकडेच आहे. मी तुला बाहेर काढतो. असं म्हटलं होतं.

पण मनसुख हिरेन यांनी सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना “मुझे इस झमेले मे मत लो” असं म्हटलं आणि त्यामूळे हिरेन यांची हत्या झाली असल्याचं सुत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे.

मनसुख हिरेनची हत्या अत्यंत निर्घूणपणे झाली होती. हत्येच्या आधी हिरेन यांना बेशुध्द करण्यात आले होते. त्यानंतर तोंडात रूमाल कोंबून त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला असल्याचं तपासात समोर येत आहे.

एटीएसच्या अटकेत असलेला निलंबित पोलिस कर्मचारी विनायक शिंदेने हिरेन यांना फोन करून तावडे बोलत असून तुमची या प्रकरणात चौकशी करायची आहे. तुम्ही भेटायला या असं सांगितलं होतं. हिरेन आणि विनायक शिंदे म्हणजे तावडे हे घोडबंदर येथे भेटल्यानंतर एका कारमध्ये बसून दोघेजण निघून गेले होते.

यादरम्यानच मनसुख हिरेन यांना बेशुध्द केलं आहे. त्यानंतर मृतदेह खाडीत फेकून दिला आहे. या प्रकरणात विनायक शिंदे घटनास्थळी उपस्थित होता. हिरेन यांची हत्या सचिन वाझेच्या समोरचं झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
दूध का दूध और पाणी का पाणी होऊनच जाऊदे! आता अनिल देशमुखांनीही घेतला आक्रमक पवित्रा
देवमाणूस! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना, आता गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार
“फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करतात आणि विचारतात…”
“सुशिक्षित लोकं जास्त असल्याने भाजपला मते मिळत नाहीत”; भाजप नेत्याची कबुली

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.