गेल्या महिन्यात एका शेतकऱ्याचा महिंद्राच्या(Mahindra) शोरूममध्ये कर्मचाऱ्यांनी अपमान केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या उलट घटना आसाममधील9Assam) एका छोट्या दुकानदारासोबत घडली आहे. आसाममध्ये एक व्यक्ती दुचाकी(Two Wheeler) घेण्यासाठी शोरूममध्ये गेला होता. दुचाकी घेण्यासाठी हा व्यक्ती पोतीभर नाणी घेऊन आला होता.(assam man going to showroom for buying scooter)
वर्षभर त्या व्यक्तीने त्याच्या पगारातील पैसे दुचाकी घेण्यासाठी साठवले होते. यूट्यूबर हिरक जे दास यांनी या व्यक्तीची कथा सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा व्यक्ती पेशाने दुकानदार आहे. या व्यक्तीला एक स्कूटर खरेदी करायची होती. दुचाकी घेण्यासाठी त्याने अनेक महिने आपल्या कमाईतील काही रक्कम बाजूला ठेवली होती.
स्कूटर खरेदी करण्यासाठीची रक्कम जमा झाल्यावर त्याने शोरूम गाठले. स्कूटर घेण्यासाठी त्याने पोतीभरून नाणी आणली होती. शोरूममध्ये पोतीभरून नाणी पाहून सगळे लोक चकित झाले. पगारातून बचत केलेल्या पैशांनी स्कुटर खरेदी करण्यासाठी आल्याचं त्या व्यक्तीने शोरूममधील कर्मचाऱ्यांना सांगितले.
https://www.facebook.com/hirak.j.das.79/posts/1549265745449973
यानंतर शोरूममधील कर्मचारी पोत्यातून आणलेले सुट्टे पैसे मोजायला बसले. त्या व्यक्तीने आणलेल्या पोत्यामध्ये १, २ आणि १० रुपयांची नाणी होती. शोरूममधील कर्मचारी नाणी मोजत होते. एवढी नाणी मोजता-मोजता शोरूममधील कर्मचाऱ्यांना घाम फुटला. पूर्ण नाणी मोजून झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला स्कुटरची चावी देण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नाण्यांनी भरलेलं पोतं तीन व्यक्ती उचलत असल्याचे दिसत आहे. ही नाणी प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचे नाव सांगण्यात आलेले नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचा महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये अपमान करण्यात आला होता. त्यानंतर त्या शेतकऱ्याने काही तासात पैसे जमवत शोरूममधील गाडी विकत घेतली होती. त्या शेतकऱ्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
किडनीच्या मोबदल्यात चार कोटी रुपयांचे अमिष दाखवत गायिकेने मोलकरणीला गंडवले
..त्यामुळे मी अर्जुनचे सामने बघायला कधीच जात नाही, सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा
उर्फी जावेद पडली प्रेमात, या प्रसिद्ध गायकाला करत आहे डेट, व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण