कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याची गरज नाही; भाजपचा आरोग्यमंत्री बरळला

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संबधीचे नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग याचे पालण करणे गरजेचं आहे.

तर दुसरीकडे आसामचे आरोग्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी एक विचित्र विधान केले आहे. लोकांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आता मास्क लावण्याची गरज नाही कारण आता हा विषाणू राज्यात नाही, असे अजबगजब विधान त्यांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीदरम्यान हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकांच्या मास्क घालण्यावर आश्चर्य व्यक्त केले. आसाममध्ये मास्क घालण्याची गरज नाही. राज्यात जेव्हा मास्क घालायची गरज असेल तेव्हा ते सांगतील असेही ते म्हणाले.

चिंता वाढली! २४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ६० हजार ४८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बिग ब्रेकींग! छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना २० जवान शहीद; मोदींनी व्यक्त केला शोक

गेल्यावर्षी धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या RCB च्या खेळाडूला कोरोनाची लागण; IPL रद्द होणार?

शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नाला तुफान गर्दी; कोरोना नियम नेमके कुणासाठी?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.