रातोरात स्टार झाली ‘देवमाणूस’ मालिकेतील चतुर ‘डिंपी’; जाणून घ्या तिची खऱ्या आयुष्यातील कहाणी

झी मराठीने अनेक नवनवीन चेहरे लोकांसमोर आणले आहे. त्या नवीन कलाकारांच्या आयुष्यात मोठे बदल घडू लागले. अश्या नवीन चेहऱ्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच झी मराठीवरील अनेक मालिका बंद झाल्या परंतु तरीही त्या आजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

अश्या बंद झालेल्या मालिकांमध्ये अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळाले त्यातील एक चेहरा म्हणजे ‘ डिंपल’. देवमाणूस मालिकेत डिंपल भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या डिंपलचा स्पष्टवक्तेपणा लोकांना खूप आवडत होता. या मालिकेतील तिचे पात्र खास होते.

मालिकेत डिंपल गावात आलेल्या बोगस डॉक्टरला त्याच्या कामात कामात मदत करत असे. या मालिकेत डॉक्टर अजित कुमार च्या भुमिकेमध्ये किरण गायकवाड दिसत होते. ज्याने आपली लागीर झालं जी मध्ये भैयासाहेब म्हणून ओळख निर्माण केली होती.

तर डिंपलची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीचे नाव अस्मिता देशमुख असे आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुखचा जन्म २९ जून रोजी पुण्यामध्ये झाला आहे. ती तिच्या कुटुंबासोबत देहू येथे राहते. ती लहानाची मोठी तिथेच झाली. अस्मिताच्या वडिलांचे नाव शरद देशमुख असे आहे. अस्मिताने आपले सर्व शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा हायस्कूलमधून पूर्ण केले असून यानंतर पुण्यातील एस एम डी टी कॉलेजमधून बीएससी ची पदवी तिने घेतली आहे.

अस्मिताला अभिनयाची आवड असल्याने तिने अनेक म्युझिक आल्बममध्येकाम केलेलं आहे. तसेच तिने काही नाटकांमध्येही काम केले आहे. तिला मालिकेत ऑडीशन देण्यासाठी तिचे सर यांनी मदत केली. तिच्या या साराचे नाव मकरंद, त्यांनीच तिला झी मराठी ऑडीशनची माहिती पुरवली.

‘देवमाणूस’ ही तिची पहिलीच मालिका, या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेत तिने ‘डिंम्पी’ हे पात्र साकारल होत आणि हे पात्र अतिशय सुंदर रीतीने घराघरात पोहचवल. ती पुण्याची असल्याने तिला सातारची भाषा शिकताना खूप मजा आली असे ती म्हणते. अश्याप्रकारे अनेक गोष्टी शिकून अस्मिता देशमुख हिने मराठी मनोरंज सृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे.

हे ही वाचा –

निवडणुकीनंतर पंढरपूरात कोरोनाचा उद्रेक; ऑक्सिजनच्या तुटवड्याने रुग्ण अक्षरश तडफडताहेत

एका व्यक्तीजवळ किती सोनं असावे? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, नाहीतर सोनं होईल जप्त

थरारक चकमकीत पोलीसांनी चोरासह पकडले ४४० हिरे; किंमत ऐकून घालाल तोंडात बोटे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.