Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होऊन एक आठवडा होऊन गेलाय. मात्र, तरी देखील सोशल मीडियावर या स्पर्धेची चर्चा रंगली आहे. उपांत्य फेरीत सिकंदर शेखच्या झालेल्या पराभवाने राज्यात वादळ निर्माण झाले आहे. या पराभवाला धर्माचा रंग चढवला जात असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे.
महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख वर जाणूनबुजून अन्याय करण्यात आला आहे. असा आरोप सोशल मीडियावर केला जातोय. दरम्यान सिकंदरच्या कुटुंबीयांनी देखील स्पर्धेतील पंचांवर गंभीर आरोप केले आहेत. सिंकदर मुस्लिम समाजाचा असल्याने स्पर्धेत त्याला डावलून कमी गुण देण्यात आले. अशा चर्चांना सोशल मीडियावर उत आला आहे.
कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले आहे. कुस्तीपटूंना पैलवान ही एकच जात असते. सर्व धर्माचे पैलवान तालमीत जाऊन व्यायाम करताना, बजरंग बलीच्या पाया पडून व्यायाम सुरू करतात. त्यानंतरच ते कुस्तीचा सराव करतात. मागील १० वर्ष मी सतत कुस्त्या जिंकल्या. परंतु, जातीचं राजकारण कुठेही झाले नाही. असे ते म्हणाले आहेत.
याशिवाय सिकंदर बद्दल बोलताना ते म्हणाले की,” मी सिकंदरला फोनवरून संपर्क करून त्याची समजूत काढली आहे. हार मान्य करत नव्या जोमाने तयारीला लाग आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरून अंतिम सामन्यात गदा जिंकून दाखव. असा सल्ला देखील दिला आहे.”
दरम्यान अस्लम काझी यांनी पंचांच्या निर्णयावर देखील आपले मत व्यक्त केले आहे. उपांत्य फेरीत सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात जो सामना झाला, त्यामध्ये काहीतरी दोष आहे. मात्र ती अनावधानाने झालेली चूक आहे. यामुळे मुस्लिम असल्यामुळे सिंकदरला हरवलं गेलं असे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जातीचा आधार घेतला जात नाही. असे म्हणत काझी यांनी कुस्तीत जातीचे राजकारण केले जात नाही असे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिंदेंच्या १६ आमदारांवर कारवाई झाली तरी वाचणार सरकार, भाजपकडे तयार आहे ‘हा’ प्लॅन बी
- ललित मोदी ऑक्सिजनवर असताना सुष्मिता सेनला मिळाली नवीकोरी मर्सिडीज, किंमत वाचून बसेल धक्का