Share

लोकं शिव्या देत आहेत पण.., दयाबेनच्या पुनरागमनामुळे संतप्त चाहत्यांवर असित मोदींनी सोडले मौन

२००८ मध्ये सुरू झालेल्या तारक मेहता का उल्टा चष्माचे लाखो चाहते आहेत, दयाबेन म्हणजेच दिशा वकाणीने शोमध्ये परतण्यास नकार दिला तेव्हापासून चाहते प्रचंड संतापले आहेत. एक-दोन महिन्यांत नवीन दयाबेन उपलब्ध होईल, असे निर्मात्यांनी चाहत्यांना सांगितले, मात्र चाहत्यांची नाराजी शिगेला पोहोचली आहे.(Tarak Mehta ka Ulta Chashma,Dayaben, Asit Modi,Disha Wakani,)

इतकेच नाही तर काही नेटकऱ्यांनी निर्मात्यांना दोन महिन्यांची मुदतही दिली आहे. आता निर्माता असित मोदी यांनी याबाबत चर्चा केली आहे. दिलेल्या मुलाखतीत असितने शोमध्ये होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलत असताना सांगितले की, कोणतीही दयाबेन एका रात्रीत परत येऊ शकत नाही.

असित मोदी म्हणाले, “आता हे मालीकेच प्रकरण आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत, पण त्यासाठी वेळ लागेल. मी मान्य करतो की लोक आम्हाला शिवीगाळ करतात कारण लोक शोशी भावनिकरित्या जोडले गेलेले आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांच्या कमेंटची मला पर्वा नाही आणि मी त्यांच्या मतांचा आदर करतो.”

असित मोदींनी पुढे इच्छा व्यक्त केली की, दिशा वकानी ‘दयाबेन’च्या भूमिकेत परत यावी. तो म्हणाला, “दया वहिनी येणार. मात्र, दिशाने ‘दया’च्या रुपात परत यावे अशी आमची इच्छा आहे. या व्यक्तिरेखेसाठी आम्ही ऑडिशन्सही घेत आहोत. ती परत आली तर छान होईल, कारण ती कुटुंबासारखी आहे.

तिचे पुनरागमन शक्य वाटत नसल्यामुळे, आम्ही बदलीसाठी ऑडिशन घेत  आहोत.” असित म्हणाला, “निर्माता म्हणून दयाबेनने पुनरागमन करावे अशी माझी इच्छा आहे. आमचे प्रयत्न सुरूच आहेत. येत्या काही महिन्यांत दया भाभीही दिसणार आहेत, अजूनही काही दाखवणार आहोत. दयाबेन एका रात्रीत परत येऊ शकत नाही, आम्हाला तिच्यासाठी मोठ्या प्रमाणावर री-एंट्री करावी लागेल कारण ती बर्याच काळापासून बेपत्ता आहे.

महत्वाच्या बातम्या
…तर माझा अर्ज १०० टक्के जाणार, आमदार-खासदारांशी चर्चा सुरू; बिचुकले लढवणार राष्ट्रपती निवडणुक
सुनील गावसकरांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आधी मला सचिन तेंडूलकर आणि आता उमरान मलिक..
टॉमेटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे हे षडयंत्र, सदाभाऊंचा इशारा कोणाकडे?

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now