Asim Sarode : शेणापासून गणपतीची मूर्ती बनवणे हा देवाचा अपमान आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असा आरोप एका व्यक्तीने केला होता. मात्र, अॅड. असीम सरोदे यांनी याला विरोध केला आहे. गाईचे शेण किंवा मूत्रापासून बनवलेली कोणत्याही देवाची मूर्ती ही त्या देवाचा अपमान ठरत नसल्याचे वक्तव्य त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये केले आहे.
अॅड. असीम सरोदे यांनी त्यांच्या फेसाबुक पोस्टमध्ये लिहिले की, शेण व गोमूत्राच्या वापरातून गणपतीच्या मूर्ती करतायेत, हा देवाचा अपमान आहे? कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे असले प्रकार करतात. आम्हाला या बद्दल कोर्टात केस करायची आहे. काल मला फोनवरून एक व्यक्ती रागारागात सांगत होती.
मी त्यांना सांगितले की शेणाच्या व गोमूत्राच्या गणपती मूर्ती करणाऱ्यांचा उद्देश देवाचा अपमान करणे, अप्रतिष्ठा करणे व हिंदू धर्माला तुच्छ लेखण्याचा आहे असे मला वाटत नाही. यावर ते व्यक्ती म्हणाले, अहो….. शेणाच्या व मूत्राच्या देवाच्या मूर्ती करणे हाच चुकीचा, अपमानास्पद प्रकार आहे आणि त्यात दुसरा काय उद्देश असणार? तुम्ही घ्या केस आम्ही खर्च करायला तयार आहोत, अशी मागणी त्यांना एका व्यक्तीने केली असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले.
पुढे त्यांनी लिहिले की, मी त्यांना नम्रपणे सांगितले की मला मुळात हा विषय पटला नाही, त्यामुळे तुमचे पैसेही नकोत व केस सुद्धा नको. मला जो विषय योग्य वाटतो, ज्यात संविधानाचा दृष्टिकोन व लोकशाहीचा नवीन अर्थ मांडता येत असेल त्या केसेस मध्ये मी मनापासून सहभागी होऊ शकतो. त्यांनी फोन कट केला.
आज गोशाळेत शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणपती मूर्तींची बातमी प्रसिद्ध झाली ती जरूर वाचावी. देव आहे असे वाटणाऱ्या सगळ्यांनी लक्षात घ्यावे की देव आपल्या डोक्यात असतो. आपल्यातील विकृत, अपरिपक्व, विद्वेषी विचार देवाच्या नावावर जमा करून देवाचाच राक्षस करण्याचा कुणाला अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
तसेच माणसांना पुढे नेणारा विचार देव आहे व मागासलेला विचार म्हणजे राक्षस आहे. तुम्ही देवाची आराधना करता की, राक्षसाची यावरून माणूस म्हणून तुमचा दर्जा ठरणार आहे. देव ही मनाची एक चांगली स्थिती असेल तर भावनांना सकारात्मक व माणुसकीप्रधान आकार देणे माणसाला जमले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गाईचेच शेण व मूत्र नाही तर इतर कोणत्याही पाळीव प्राण्यांचे शेण व मूत्र वापरून आकारास येणारी कोणत्याही देवाची मूर्ती देव या संकल्पनेचा अपमान ठरत नाही, असेही त्यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
BJP : भाजप मनसेकडून एकमेकांवर कौतूकाचा वर्षाव; दोघांच्या युतीचे स्पष्ट संकेत
Amit Shah : तुमच्या मुलाऐवजी बिगर भाजप नेत्याने ‘ते’ कृत्य केले असते तर…; अभिनेत्याचा अमित शहांना सवाल
Ramdev Baba: एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे गौरव पुरूष, तेच बाळासाहेबांचे खरे वारसदार; रामदेवबाबांची स्तुतीसुमने
MNS : दसरा मेळाव्यावरून शिवसेना-शिंदे गटाला मनसेने सुनावले, ट्विट करत म्हणाले,”वारसा हा वास्तूचा नसून….