Share

Asia Cup 2025 Hockey मोठी बातमी: भारत-पाकिस्तानचा आशिया चषकातील सामना रद्द; पाकिस्तानी संघाचा भारतात येण्यास नकार

Asia Cup 2025 Hockey : आगामी आशिया चषक हॉकी 2025 (Asia Cup Hockey 2025) स्पर्धेपूर्वीच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पाकिस्तान हॉकी संघाने भारतात येण्यास नकार दिल्यानं दोन्ही संघातील हा सामना रद्द करण्यात आला आहे.

भारतात स्पर्धा, पण पाकिस्तानचा सहभाग नाही

२७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान बिहारच्या राजगीर (Rajgir, Bihar) येथे ही स्पर्धा होणार आहे. आशिया खंडातील ८ संघ यामध्ये सहभागी होणार होते. मात्र, पाकिस्तान (Pakistan) हॉकी महासंघाने सुरक्षेचे कारण देत भारतात येण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या निर्णयामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील थरारक सामन्याला मुकावं लागणार आहे.

भारताने दिलं बांगलादेशला आमंत्रण

पाकिस्तानच्या या निर्णयानंतर भारतीय हॉकी संघटनेने बांगलादेश संघाला आमंत्रण दिलं आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास तयारी दर्शवली होती, मात्र पाकिस्तानने देशांतर्गत सुरक्षेचे कारण सांगत स्पर्धेतून माघार घेतली आहे.

सहभागी होणारे देश कोणते?

पाकिस्तानच्या गैरहजेरीत आशिया चषक २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची यादी पुढीलप्रमाणे:

  • भारत (India)

  • चीन (China)

  • जपान (Japan)

  • मलेशिया (Malaysia)

  • दक्षिण कोरिया (South Korea)

  • ओमान (Oman)

  • चिनी तैपेई (Chinese Taipei)

  • (संभाव्य) बांगलादेश (Bangladesh)

विजेता ठरेल विश्वचषकासाठी पात्र

या स्पर्धेचा विजेता संघ २०२६ मध्ये नेदरलँड (Netherlands) आणि बेल्जियम (Belgium) येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल. तसेच अव्वल ५ संघ २०२६ च्या पात्रता फेरीत भाग घेणार आहेत.

भारत-पाकिस्तान संबंधांचा क्रीडा क्षेत्रावर परिणाम

पहलगाम (Pahalgam) येथे घडलेल्या अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. याचा परिणाम क्रीडा विश्वावरही दिसतोय. भारताने पूर्वीही क्रिकेट किंवा इतर क्रीडा स्पर्धांमध्ये पाकिस्तानमध्ये जाणं टाळलं होतं. त्यामुळेच क्रिकेटचा आगामी आशिया चषक युएई (UAE) मध्ये आयोजित केला जात आहे.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now