मी खांद्याच्या दुखण्याने बेजार, राकेश चालू शकत नाही; करोडपती गुंतवणूकदार म्हणतोय पैसा सर्वस्व नाही…

अश्विनी गुजराल हे नाव गुंतवणूकदारांना माहिती असेल. भांडवली बाजारातील हे एक नावाजलेले नाव आहे. गुंतवणूकदार आणि पोर्टफोलिओ मॅनेजर अश्विनी गुजराल यांचे एक ट्वीट सध्या खुप व्हायरल होत आहे. त्यांचे हे भावनिक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कोट्यावधींची संपत्ती असलेल्या गुजराल यांनी सांगितले की, पैसा सर्वस्व नाही. तब्येतीची हेळसांड करून पैसा कमावण्यात काही अर्थ नाही. स्टॉक मार्केट गुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या अश्विनी गुजराल यांनी भांडवली बाजारातून आतापर्यंत कोट्यावधी रुपये कमावले आहेत.

गुजराल अनेक ठिकाणी शेअर गुंतवणुकीबाबत आपले मत मांडत असतात. भांडवली बाजाराबाबत त्यांचा अनुभव खुप दांडगा आहे. त्यांच्या विश्लेषणाला गुंतवणूकदार खुप महत्व देतात. पण त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सगळ्यांना एक सल्ला दिला आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या ट्वीटमध्ये गुजराल यांनी आपल्या स्वताच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून खांद्याच्या दुखण्याने बेजार झालो आहे. राकेश चालू शकत नाही. तब्येतीची हेळसांड करून कमावलेल्या पैशांचा काही फायदा नाही, हे लक्षात ठेवा.

आपल्याही पलिकडे बाजाराची ही एक स्वताची दुनिया आहे, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. गुजराल यांच्या ट्वीटला अनेक लोकांनी लाईक केले आहे आणि अनेक लोकांनी या ट्वीटवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांना राकेश झुनझुनवालांसोबत असलेल्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारले आहेत.

गुजराल यांनी या ट्वीटमधून गुंतवणूकदारांना सांगितले आहे की पैसा हे सर्वस्व नाही. दरम्यान, कोरोनाच्या काळात राकेश झुनझुनवाला जवळपास १८ महिने आजारी होते. या काळात त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात करत मधुमेहावरही नियंत्रण मिळवले होते.

भारतातील वॉरेन बफे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची एकून मालमत्ता ५.५ अब्ज डॉलर म्हणजे ३८ हजार कोटी इतकी आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा १८ वा नंबर आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी मोदींची भेट घेतली होती. तेव्हा झुनझुनवाला खुर्चीवर बसून त्यांच्याशी बोलत होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

महत्वाच्या बातम्या
एकाच सामन्यात रोहीतने मोडले विराटचे अनेक विश्वविक्रम, भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं
शेवटपर्यंत सरकारला दिली नाही जमीन, हायवेच्या मधोमध आहे ‘या’ महिलेचे घर, वाचा अनोखा किस्सा
अखेर परमबीर सिंगाचा ठावठिकाणा लागलाच, न्यायालयाकडून मिळाला सर्वोच्च दिलासा
इशान किशनचा बुलेट थ्रो पाहून राहुल द्रविड झाला इम्प्रेस, डग आउटमध्ये केले असे काम, लोकांनी केले सलाम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.