कुटुंब कोरोनाविरूद्ध लढा देतयं, मी त्यांच्यासोबत राहीलं पाहीजे; म्हणत अश्विनने सोडली आयपीएल

नवी दिल्ली | आयपीएलच्या १४ व्या मोसमाचा थरार चांगलाच रंगात आला आहे. आयपीएलमधील  संघातील खेळाडूंनी मैदान गाजवायला सुरूवात केली आहे. अशातच दिवसेंदिवस क्रिडा विश्वातून धक्कादायक घटना समोर येत आहेत.

भारतीय संघाचा खेळाडू आणि फिरकीपटू आर अश्निन या आयपीएलच्या मोसमात दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळत आहे. मात्र आता इथून पुढच्या सामन्यांत न खेळण्याचा निर्णय आर अश्विने घेतला आहे. अश्विनच्या या निर्णयाने दिल्ली कॅपिटल संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आर अश्विनने ट्विट करून म्हटलं की, ‘मी उद्यापासून या वर्षीच्या हंगामामधून ब्रेक घेत आहे. माझं कुटूंब सध्या कोविड १९ विरोधात लढा देत आहे. या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे. जर या गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळण्याची आशा आहे’.

रविचंद्नन अश्विन भारताचा उत्तम फिरकीपटू आहे. २००९ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात त्याला चेन्नई सुपर किंग्स संंघाने संधी दिली होती. या हंमामात त्याला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती.

काल चेन्नईमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूध्द सनराईज हैदराबाद संघाचा सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर रात्री उशिरा आर अश्विनने १४  व्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाकडून खेळत आर अश्विनने ४६ ट्वेंटी-२० सामन्यात ५३ विकेट घेतल्या आहेत. तर आयपीएलमधील आतापर्यंतच्या सामन्यात १३९ विकेट घेतल्या आहेत. या मोसमात त्याने ५ सामने खेळले आहेत. पण त्याला चांगली कामगिरी दाखवता आली नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झालीय ‘अशी’ अवस्था; ओळखणे देखील आहे कठिण
जडेज्याने एकाच ओव्हरमध्ये ३७ धावा ठोकत आरसीबीला कुटले, तीन बळी घेत सामनाही जिंकवला
कोरोनाने मुलाला हिरावले; ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून आईवडीलांनी तोडली १५ लाखांची एफडी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.