हे वर्ष अनेकांसाठी धक्कादायक गेले आहे. कोरोनाचे संकट आहेच, यातच अनेकांनी आत्महत्या देखील केली. काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हीचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर मयुरी देशमुखला मोठा धक्का बसला.
यावेळी तिला अनेकांनी आधार दिला विशेष म्हणजे धीर देणाऱ्या लोकांमध्ये डॉ. शीतल आमटे यांचे देखील नाव होते. हे वाचून अनेकांना धक्का बसला असेल. कारण डॉ. शीतल आमटे यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली.
शीतल आमटे यांनी मयुरीला जे काही बोलले ते वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे वाचून अनेकांना प्रश्न पडेल मग शीतल आमटे आत्महत्या कशा करू शकतात. आशुतोषने आत्महत्या केल्यानंतर शीतल यांनी मयुरीला स्वतः मेसेज केला होता.
यावेळी त्यांनी मयुरीला म्हटले होते की मी तुझ्या मागे खंबीरपणे उभे आहे, तसेच त्यांनी मयुरीला धीर दिला व मयुरीच्या धीराचे कौतुक देखील केले होते. शीतल यांनी स्वतः मयुरीला त्यांचा नंबर दिला व तिचा नंबर देखील घेतला होता. यावेळी मयुरीला देखील मोठा आधार वाटला.
त्यांचा तो मोठेपणा मयुरीला खूपच भावला होता. तसेच आशुतोषच्या निधनापूर्वी मयुरीने शीतल यांचा एक व्हिडिओ आशुतोषला दाखविला होता ज्यात त्यांनी डिप्रेशनचा कसा सामना केला होता, ते सांगितले होते. मात्र आता त्यांनीच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आता डॉ. शीतल आमटे यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला असल्याचे व ती परत एकदा अस्वस्थ झाल्याचे म्हटले आहे. दुसऱ्याला इतके छान समजावनाऱ्या महिलेने स्वतः आत्महत्या केल्याने मयुरीला धक्का बसला असावा. तुम्हाला कसलाही त्रास असेल तर तुम्ही ते कोणाजवळ तरी बोलत रहा, असे मयुरीने पुढे म्हटले आहे.
दरम्यान या सर्वच घडामोडीत शीतल आमटे यांनी का आत्महत्या केली, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यांचे कार्य सर्वांना माहीत आहे. अचानक त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.