“हिम्मत असेल टीका करण्यापेक्षा, किरीट सोमय्या यांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी”

नाशिक, नागपुर, मुंबई इथल्या रुग्णालयातील खळबळजनक घटनांच्या आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील मुंब्राच्या येथे असलेल्या एका खाजगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आग लागली आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

मुंब्रा येथे असलेल्या जुन्या मुंबई-पुणे रोडवर असलेल्या शिमला पार्क परिसरातील हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात आग लागली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

प्राईम रुग्णालयात झालेल्या घटनेनंतर भाजप नेते किरिट सोमय्या तेथे गेले होते. त्यावेळी ठाकरे सरकारच्या काळात कोविड हत्याकांड सुरु आहे, अशी टिका त्यांनी ठाकरे सरकारवर केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी किरिट सोमय्या यांना चांगलेच फटकारले आहे.

आम्ही जनतेचे जीव वाचवण्याला महत्व देत आहोत. प्रत्यक्ष मदतीच्या वेळी घरात बसणारे, येथे येऊन आता राजकारण करत असतील, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अश्रफ शानू पठाण यांनी दिला आहे.

तसेच आताची वेळ ही राजकारण करण्याची नाही, जगलो तर राजकारण करुच. पण त्याआधी टीका करण्यापुर्वी हिम्मत असेल, तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दाखवा, असेही खडेबोल अश्रफ शानू पठाण यांनी सोमय्या यांना सुनावले आहे.

किरिट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन महाविकास आघाडी सरकारवर टिका करत होते. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली आहे. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या सोमय्या यांना परत जावे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

विवाहीत अभिनेता रवी किशनच्या प्रेमात पडली होती नगमा; रवीच्या पत्नीला समजल्यावर मात्र…
गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो आणि फक्त पोरींचे फोन उचलतो – एकनाथ खडसे
मी जगलोय, आता त्या तरुणाला जगण्याची गरज; ८५ वर्षीय आजोबांनी केला ऑक्सिजन बेडचा त्याग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.