याला म्हणतात अनुभव! अशोक चव्हाणांनी मोठा घोटाळा शोधून मुख्यमंत्र्यांना वाचवले

राज्याच्या मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती.

पण त्यानंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या वरच्या भागात लाल पेनाने एक अतिरिक्त मजकूर (शेरा) लिहण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असे म्हटले होते.

ही घटना उघडकीस आल्यानंतर मंत्रालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ही फाईल परत आली होती. त्यावेळी फायलीवरील शेरा पाहून अशोक चव्हाण यांना धक्का बसला होता. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या प्रस्तावात बदल केला होता.

अशोक चव्हाण यांना फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय वाटला. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कसाबसा लिहला होता. पण नेहमी मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. आणि हा प्रकार उघडकीस आला.

करिना कपूरने सांगितले बेडरुममधले ‘हे’ रहस्य; म्हणाली रोज सकाळी सैफ…

महाराष्ट्र पुन्हा हादरला! दोन वर्षाच्या कोवळ्या बालकावर नराधमाने केले अत्या.चार

विकृतपणाचा कळस! महिलांच्या बेडरुमधील खासगी क्षण पाहण्यासाठी ‘त्याने’ केले २०० सीसीटिव्ही हॅक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.