Share

७०० कोटींची संपत्ती असणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांनी ‘Shark Tank India’ शो साठी घेतले तब्बल ‘इतके’ रुपये

Ashnir-grover-2

सोनी टीव्हीवरील ‘शार्क टँक इंडिया’ हा शो सध्या खूप चर्चेत आहे. या शो ला प्रेक्षकांकडून देखील मोठी पसंती मिळत आहे. भारतातील उद्योग आणि गुंतवणुक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती या शोमध्ये परीक्षक म्हणून सामील झाले आहेत. या शोमध्ये भारत पे चे संस्थापक अशनीर ग्रोव्हर हे देखील परीक्षक आहेत. अशनीर ग्रोव्हर हे त्यांच्या नेट वर्थ आणि जीवनशैलीमुळे चर्चेत आहेत.(ashnir grover charge 10 lakhs per episode for shar tank india show)

‘शार्क टँक इंडिया’ या शोमध्ये स्पर्धक परीक्षकांसमोर उद्योगाबाबतची एखादी कल्पना मांडतात. जर परीक्षकांना ही कल्पना आवडली तर ते या व्यावसायिक कल्पनांवर गुंतवणूक करतात. अनेक स्पर्धकांना यामाध्यमातून व्यावसायिक गुंतवणूक मिळाली आहे. ‘शार्क टँक इंडिया’ मधील परीक्षकांमध्ये अशनीर ग्रोव्हर हेसर्वाधिक चर्चेत असणारे परीक्षक आहेत.

अशनीर ग्रोव्हर हे फिनटेक कंपनी भारत पे चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची कंपनी वर्षाला करोडोंचा नफा कमावते. ‘शार्क टँक इंडिया’ या शोच्या पहिल्या सत्रात अशनीर ग्रोव्हर हे त्यांच्या तापट स्वभावामुळे ओळखले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अशनीर ग्रोव्हर यांची सुमारे ७०० कोटींची संपत्तीं आहे.

अशनीर ग्रोव्हर हे ‘शार्क टँक इंडिया’ या टीव्ही शोमधील सर्वात महागडे परीक्षक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशनीर ग्रोव्हर हे ‘शार्क टँक इंडिया’ च्या एका एपिसोडसाठी १० लाख रुपये इतकी रक्कम चार्ज करतात. भारत पे मधून करोडोंची कमाई करणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांनी २२ वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये आपले पैसेही गुंतवले आहेत.

अशनीर ग्रोव्हर यांनी Jupiter, Transaction Club, RuPayFi, Junio, Liquilon, UNI, Nazara आणि Vahan सारख्या स्टार्टअप्समध्ये आपली गुंतवणूक केली आहे. आलिशान जीवनशैली जगणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांना महागड्या वाहनांची आवड आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. यामध्ये मर्सिडीज मेबॅच एस ६५० आहे. या गाडीची किंमत २.५ कोटी रुपये आहे.

तसेच त्यांच्याकडे १.८९ कोटी रुपये किंमत असलेली पोर्शे केमन ही गाडी देखील आहे. याव्यतिरिक्त अशनीर ग्रोव्हर यांच्याकडे मर्सिडीज बेंझ, जीएलएस ३५० आणि ऑडी ए६ देखील आहे. भारत पे चे संस्थापक अशनीर ग्रोव्हर हे सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्यांचा दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत ३० कोटींच्या आसपास आहे. या बंगल्यात अशनीर अशनीर ग्रोव्हर त्यांच्या कुटूंबासोबत राहतात.

महत्वाच्या बातम्या :-
‘मी काहीही चोरलेले नाही…, मात्र, तुम्ही भिकारी’, घरात काहीच न मिळाल्यानं चोराची सटकली
HR आणि कामगारामध्ये तूफान राडा, HR ची गाडी अडवून फोडली; वाचा नेमकं काय घडलं
संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस; खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवली खंत

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now