Arnab Is Back! आशिष शेलारांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार, म्हणाले…

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. पण आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. तसेच गोस्वामींसह इतर दोन जनांना अंतरीम जामीन देण्यात आला आहे.

गोस्वामींना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर होताच भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच ट्विट करत त्यांनी न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असे म्हटले आहे.

तसेच ट्विटमध्ये शेलार यांनी #Arnabisback हा हॅशटॅगही दिला आहे. शेलार म्हणतात, ‘धन्यवाद आदरणीय सुप्रीम कोर्ट…कायद्याचं राज्य कायम आहे. न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही.’

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांचा अर्ज नामंजूर करणे ही मुंबई हायकोर्टाची चूक होती असं न्यायालयाने नोंदविले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

गोस्वामींचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. तसेच मुंबई हायकोर्ट व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांनी बिहार आणलं, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत – नितेश राणे
अन्वय नाईक आत्मह.त्या प्रकरणी अर्णबच्या वकीलांचा हादरवून टाकणारा दावा; केस फिरली
अर्णबच्या वकिलांचा सवाल; ‘…मग मुख्यमंत्र्यांनाही अटक करणार का?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.