“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?”; भाजपचा सवाल

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. पण काल प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार घडला. यावर केंद्र सरकारवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ताशेरे उडवले. आता यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टिका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, “कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार. दिल्ली आंदोलनातील हिंसाचाराच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही? पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट देशाचे जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही?”.

तसेच “आंदोलनात जो वाद पहिल्यापासून सुरु आहे त्याचे समर्थन शरद पवार, संजय राऊत यांनी केलं. मग हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?” असे शेलार यांनी प्रश्न विचारले. सोबतच सदर प्रकरणी चौकशी होणं अतिशय गरजेचं असून, षडयंत्र रचणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. अशी मागणीही केली आहे.

तसेच “दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही. ‘महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत.”

“ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं.” अशी घनाघाती टिका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमदाराचा राजीनामा; केले ‘हे’ गंभीर आरोप

पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.