“पब आणि पार्टी गँगची तुरुंगवारी निश्चित, यात कुणी सत्ताधारी आहेत का?”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात दिशाभूल करणारे अदृश्य हात आता समोर येतील. लॉकडाऊन काळात 15 हजार पेक्षा जास्त जणांचा जीव गमवला असताना बेकायदेशीरपणे पार्ट्यांचं आयोजन करणारी पब आणि पार्टी गँग जेलमध्ये जाईल, असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. या निर्णयानंतर आशिष शेलार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.

लॉकडाऊन काळात मुंबईत पार्ट्याचं आयोजन करणाऱ्यांमध्ये कुणी सत्ताधारी पक्षातील होते का?, असा सवाल आशिष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला आहे.

लॉकडाऊन काळात लोक घरातून बाहेर पडू शकत नव्हते. दुर्देवाने मित्रपरिवार किंवा कुणी नातेवाईकाचा मृत्यू झाला तर त्यांचं अत्यंदर्शनही घ्यायला जाता येत नव्हतं. अशावेळी मुंबईत पार्ट्या झाल्या हे स्पष्ट होत आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.