न्यायालयाच्या आदेशामुळे आघाडी सरकारचे पितळ पुर्णपणे उघडे पडले, महाराष्ट्राची देशभरात बदनामी

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीरसिंग यांनी आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमुर्ती दिपांकर दत्ता यांनी हे आदेश दिले.

याप्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पुर्णपणे उघडे पडले आहे असे म्हणत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिश शेलार यांनीही ठाकरे सरकारवर धारेवर धरले आहे.

शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पुर्णपणे उघडे पडले. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या तक्रारीवरुन विद्यमान गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ यावी.. यामुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच!

आता तोंड लपवायला जागा न उरल्याने नैतिक जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजिनामा द्यावा. तसेच एवढे दिवस तोंडावर “मास्क” लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे! अशा शब्दांत आशीष शेलार यांनी ठाकरे सरकारवर तुफानी हल्ला चढवला आहे.

दरम्यान हायकोर्टाचा हा निर्णय अनिल देशमुखांना मोठा झटका मानला जातोय. १५ दिवसांत सीबीआयने ही चौकशी पुर्ण करावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अनिल देशमुखांनी दर महीन्याला १०० कोटी रूपयांच्या वसूलीचे टार्गेट पोलीसांना दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता.

ह्या चौकशीनंतर अनेक घडामोडी व गौप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनिल देशमुखांच्या चौकशीला नकार देणारी महाविकास आघाडी देखील हायकोर्टाच्या या निर्णयाने अडचनीत आली आहे. तर अनिल देशमुखांचा पाय देखील आणखी खोलात जात आहे.

काही दिवसांपुर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. या आरोपांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. ती हायकोर्टाने मान्य केली आहे.

वकील जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचाही विचार न्यायालयाने आपला निकाल देताना केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जयश्री पाटलांनी पत्रकार परीषदेत अनेक गंभीर आरोप केले.

अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचा तुमच्यावर वरदहस्त असेल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. न्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय. असाही आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या
अनिल देशमुखांचा पाय खोलात; उच्च न्यायालयाने दिले सीबीआय चौकशीचे आदेश

माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना एका झटक्यात बरा करतो; डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन
अनंत करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड पुरते अडकले; हायकोर्टाने दिले निर्देश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.