Share

Ashish Shelar : सामनातील अग्रलेखावरून शेलारांचा ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले, “मग घ्या ना….

Uddhav Thackeray Ashish Shelar

Ashish Shelar : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून अनेकदा भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यात येत असते. यातच आता भाजपने मुंबईत सुरु केलेल्या मराठी दांडियावरून आज सामनातून निशाणा साधला आहे. याचेच प्रत्युत्तर देत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे.

“महापालिकेवरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे. लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी माणसांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे,” असे सामनात म्हटले आहे.

तसेच गणपती उत्सवानंतर भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल असा त्यांचा भ्रम आहे, असेही यात म्हटले आहे. “कमळाबाईंचा आता मराठी दांडिया!” असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजपला डिवचण्यात आले आहे.

या सगळ्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंचा समाचार घेतला आहे. “ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली.. ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले, त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत,” असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

तसेच पुढे ते म्हणाले की, ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला “मग घ्या ना धौती योग!”, असे म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शेलारांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, भाजप दरवर्षीच दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुखदुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे “करून दाखवले” असे हेडिंग लावले नाहीत. पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता “थापा” पण राहिला नाही आणि उत्सवही… यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली, असेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

तसेच गिरणगावात म्हणजेच लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच!, असेही यात म्हटले आहे.

अहंकार, गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करून तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्याचरणी एकच प्रार्थना… प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशांपासूनि सोडावी, तोडी भवपाशा, असे म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या
आशिष शेलार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार 
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर आशिष शेलारांनाही मिळाली मोठी जबाबदारी
भाजपाकडे ११३ मते असताना १२३ मते कशी व कुठून आली? आशिष शेलारांनी फोडलं गुपित
आताच एवढे बावचळलात, विधानपरिषद गुप्त मतदानाने आहे, त्यावेळी काय करणार? शेलारांचा मविआला सवाल

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now