पारंपारिक शेती खर्चिक असल्यामुळे सोडली आणि केला हा प्रयोग, आता कमवतोय लाखो रुपये

 

आजकाल तरुण तरुणी एखाद्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा शेती करण्याला प्राधान्य देत आहे.  तरुण शेतात पारंपारिक पिक घेण्यापेक्षा शेतात वेगवेगळे प्रयोग करताना आता दिसून येत आहे. आजची गोष्ट पण अशाच एका तरुण शेतकऱ्याची आहे.

गुंडरदेही विकासखंडमध्ये राहणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचे नाव आशिष दिल्लीवार असे आहे. तो २९ वर्षांचा असून तो मिर्चीची आणि काकडीची शेती करुन महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

आशिष बालोद जिल्ह्यातला असा एकमात्र शेतकरी आहे, जो पारंपारिक शेती करण्याशिवाय मिर्ची आणि काकडीची शेती करुन चांगला नफा मिळवत आहे. तो मिर्चीची पाच एकर आणि काकडीची शेती तीन एकरमध्ये आधूनिक पद्धतीने करत आहे.

पाच एकर शेतीत ३ लाख रुपये खर्च करुन तीन महिन्यात साडे सात रुपयांचा नफा मिळाला आहे. तसेच काकडीची शेतीमध्ये दिड लाखांची गुंतवणूक करुन तीन लाख रुपये कमवले आहे.

आलेले उत्पन्न आशिष बालोद, दुर्ग, भिलाई आणि राजनांदगांवच्या बाजारात विकतो. पण दोन वर्षांपासून मिर्चीची आणि काकडीची मागणी  महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने तिथेही तो हा माल पाठवत आहे.

मिर्चीची शेती करण्यासाठी प्रति एकर  शेतीत ६० हजार रुपये खर्च येतो, ज्याच बियाणे, मजूरी, सिंचन, खत, यांच्यावर होणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. तीन महिन्यात एक एकरात दिड लाखांचा फायदा होतो.

अशाचप्रकारे काकडीच्या शेतीत ५० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते, त्यातुन दोन महिन्यात एक लाख रुपयांचा फायदा होतो. ड्रिप सिस्टिमच्या माध्यामातून आशिष मिर्चीची झाडे लावत आहे. तो एक एकरामध्ये ७ हजार मिर्चीचे झाडे लावतो.

पहिले आशिष पारंपारिक शेती करत होता, पण त्यामध्ये पाणी आणि खत मोठ्या प्रमाणात लागायचे, तसेच ही शेती करण्यासाठी त्याला खुप मेहनत घ्यावी लागायची. त्यामुळे त्याने मिर्चीची आणि काकडीची शेती करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकटाच शेतकरी असेल ज्याला तांदुळ बाजारातून विकत आणावे लागतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.