“जर तुम्हाला या गोष्टीची लाज वाटत नसेल तर आम्हालाच समाजाचा एक भाग असल्याची लाज वाटते”

मुंबई । मुंबई उच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला फटकारले आहे. नागपूरच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोचवण्याच्या आपल्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज नाराजी व्यक्त केली.

या वाईट समाजाचा भाग असल्याची लाज वाटते. उच्च न्यायालयाने असेही म्हटले, की ते महाराष्ट्रात कोरोना रुग्णांसाठी काहीच करू शकत नाहीत. यामुळे राज्य सरकारवर देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की लोकांना हे जीवनरक्षक औषध न मिळाणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. आता हे प्रशासन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

जर तुम्हाला स्वतःला या गोष्टीची लाज वाटत नसेल तर आम्हालाच या वाईट समाजाचा एक भाग असल्याची लाज वाटत आहे. आपण आपल्या कर्तव्यांपासून पळ काढत आहोत. तुम्ही रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करत आहात.

आम्ही तुम्हाला एक उपाय देत असतो मात्र त्याचे पालनदेखील तुम्ही करत नाही. तुम्ही आम्हाला काहीच उपाय देत नाही. इथे नेमकं काय सुरू आहे, असा सवालही न्यायालयाने केला आहे.

न्यायालयाने आज लोकांना होत असलेला त्रास कोरोनासंदर्भातील सर्व याचिकांवर एकदाच सुनावणी केली. राज्यात मुंबई, पुणे, नागपूरसह इतर शहरांमध्येही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. तसेच राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत नागपूरमध्ये १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. मात्र तसे झाले नसल्याने न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे तुम्ही आयुक्त म्हणून पाहीजे होतात; कालच्या दुर्घटनेनंतर नाशिककरांची आर्तहाक

राजेश टोपेंची मोदींना कळकळीची विनंती; आम्ही पाया पडायला तयार, पण ऑक्सिजन उपलब्ध करा

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रतन टाटांचे न्यायालयाकडून कौतूक; केंद्राला मात्र झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.