काल भारतरत्न गायिका लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचे निधन झाले. महान गायिका लता मंगेशकर या ‘स्वर कोकिळा’ या नावाने देशात आणि जगात प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर निधनानिमित्त त्यांची बहीण आशा भोसले(Asha Bhosale) यांनीही त्यांची भावपूर्ण आठवण काढली आहे. आशा भोसले यांनी स्वतःचा आणि लता मंगेशकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(asha bhosale shear photo of lata mangeshkar and her on social media)
हा फोटो आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या बालपणातील आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या छायाचित्रासोबत आशा भोसले यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काय होते ते बालपणीचे दिवस, दीदी आणि मी.’ गायिका आशा भोसले यांनी या इंस्टाग्राम कॅप्शनसोबत हार्ट शेपचा इमोजी देखील शेअर केला आहे.
गायिका आशा भोसले यांच्या या पोस्टला ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचवेळी या इंस्टाग्राम पोस्टवर १८०० हून अधिक जणांनी कमेंट्स आल्या आहेत. या इंस्टाग्राम पोस्टवर भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या अखेरच्या दर्शनाला लोकांनी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गायिका लता मंगेशकर यांना आधी कोविड आणि नंतर न्यूमोनिया झाला होता. गेल्या २९ वर्षांपासून त्यांची प्रकृती नीट नव्हती. काल ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१२ वाजता गायिका लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न महान गायिका लता मंगेशकर यांचा अंत्यसंस्कार मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाला.
गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार देखील उपस्थित होते. यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अमीर खान आणि रणबीर कपूर यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. गायिका लता मंगेशकर यांनी २०१५ मध्ये आलेल्या ‘डुन्नो वाई’ चित्रपटासाठी शेवटचे गाणे गायले होते. २००१ मध्ये गायिका लता मंगेशकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :-
शाहरूख खानसाठी उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, ‘याला थुंकणे नाही फुंकणे म्हणतात’
वडिलांच्या निधनानंतर सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर; म्हणाला, वडील गमावल्यानंतर माझी..
उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत कारण.., डिस्चार्ज मिळताच सोमय्या बरसले