आशा भोसले यांनी पळून जाऊन केले होते लग्न; वाचा लव्ह स्टोरी

बॉलीवूड चित्रपटांप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक जोड्यांनी लव्ह मॅरेज केली आहे. त्यातील काही जोड्या तर अशा आहेत. ज्यांनी प्रेमासाठी कुटूंबाला मागे टाकले होते. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते.

पळून लग्न केल्यानंतर काही कलाकारांनी शेवटपर्यंत ते नातं टिकवलं तर काही कलाकारांचे घटस्फोट झाले. पण तरीही कलाकारांनी प्रेमाला सोडले नाही. आजही अशा अनेक जोड्या आहेत ज्या पळून जाऊन लग्न करतता. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या जोड्या

पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रदीप शर्मा – बॉलीवूडच्या गाजलेल्या लव्ह स्टोरीजमध्ये पद्मिनीची लव्ह स्टोरी खुप प्रसिद्ध आहे. एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहीली भेट झाली होती. पहील्याच भेटीत पद्मिनी प्रदीपच्या प्रेमात पडल्या होत्या.

पण त्यांच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केले. त्यांवेळी पद्मिनीचे वय फक्त २१ वर्ष होते. दोघांच्या लग्नानंतर त्यांच्या घरच्यांनी हे नातं स्वीकारावे लागले. आज पद्मिनी त्यांच्या नवऱ्यासोबत आनंदी आहेत.

आमिर खान आणि रिना दत्ता –आमिर खानने बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापुर्वीच लग्न केले होते. खुप वयात आमिर रिनाच्या प्रेमात पागल झाले होते. पण धर्म दोघांना एकत्र येऊ देत नव्हता. आमिर मुस्लिम होते तर रिना हिंदू होत्या. शेवटी आमिर आणि रिनाने पळून जाऊन लग्न केले.

दोघांच्या घरच्यांना लग्नाबद्दल समजले तेव्हा त्यांना त्याचा स्वीकार करावा लागला. ज्या नात्यासाठी दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. ते नाते जास्त काळ टिकू शकले नाही. सोळा वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला.

आशा भोसले आणि गणपत राव भोसले – बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसलेचे नाव देखील या यादीत येते. अनेकांना आपल्या आवाजाने वेडं लावणाऱ्या आशा वयाच्या सोळाव्या वर्षा गणपत राव भोसलेच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या घरच्यांना हे नाते बिलकूल मान्य नव्हते.

शेवटी आशा भोसले आणि गणराव भोसलेने पळून जाऊन लग्न केले. पण त्यांच्या कुटूंबाने कधीच त्यांचा स्वीकर केला नाही. काही वर्षांनी दोघांचे नाते नेहमीसाठी संपले.

सैफ अली खान आणि अमृता सिंग – या यादीत सर्वात पहीले नाव येते ते म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंगचे. आज दोघांना वेगळं होऊन १७ वर्ष पुर्ण झाली आहेत. पण त्यांची प्रेम कहानी खुपच रंजक होती. त्यांना लग्न करण्यासाठी अनेक दिवस संघर्ष करावा लागला होता.

पहील्याच भेटीत सैफ अमृताच्या प्रेमात पडला होता. पण हे लग्न त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हते. तरीही सैफने कोणाचीही पर्वा न करता १२ वर्ष मोठ्या अमृतासोबत लग्न केले. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद सुरु झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला.

महत्वाच्या बातम्या –

ड्रामा क्वीनचा नवा ड्रामा! पीपीई किट घालून अभिनेत्रीने केली भाजी खरेदी; पाहा व्हिडिओ
लोकांना खायला अन्न नाही, अन् तुम्ही पैसे उडवता! लाजा वाटूद्या; अभिनेत्यांवर नवाजूद्दीन संतापला
‘या’ बॉलीवूड कलाकारांच्या मुलांनी आत्तापर्यंत त्यांचे चित्रपट कधीच पाहिले नाहीत कारण…
शाहरूख खानला वाटत होते; राम मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदुंनी करावी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.