कोरोना झालेल्या प्रसिद्ध पुजाऱ्याच्या मदतीला धावून आले असदुद्दीन औवेसी; केली मोठी मदत

देशभरात कोरोनाच्या संकटाने आपले पाय पसरले आहे. काही राज्यांतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून अनेकांना बेड्स उपलब्ध नसल्यामुळे उपचार मिळत नाहीये.

अशात तेलंगणातील एका पुजाऱ्याच्या मदतीला एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी धावून आले आहे. त्या पुजाऱ्याला वेळेत बेड उपलब्ध करुन दिल्याने औवेसींचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तेलंगणा राज्याची परिस्थिती खुप गंभीर होत चालली आहे. रोज हजारो रुग्ण भेटत आहे. त्यामुळे ऑक्सिजन मिळत नाही, बेड्स उपलब्ध नाही, अशा समस्या तेलंगणातही निर्माण झाल्या आहे.

अशात हैद्राबाद येथील प्रसिद्ध लाल मंदीरातील मुख्य पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांना बेड उपलब्ध होत नव्हता. या अटीतटीच्या परिस्थितीत औवेसी त्यांच्या मदतीला धावून आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्य पुजाऱ्यांना खुप त्रास जाणवू लागला होता, पण त्यांच्यासाठी रुग्णालयात बेड मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी औवेसींशी संपर्क साधला होता, त्यानंतर औवेसींनी तातडीने प्रतिसाद देत त्यांना आसरा रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिला होता.

दरम्यान, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला लाखोंच्या संख्येत रुग्ण मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण मिळाले आहे. तर गेल्या दहा दिवसात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर काय करावे, जाणून घ्या आरोग्य मंत्रालयांनी दिलीय महत्वाची माहिती
काम न करता पठ्ठ्या घेत होत १५ वर्षे बसून पगार; पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर
कोरोना झालाय.? घाबरू नका, १०५ वर्षीय आजोबाही झालेत बरे, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.