प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं; वाचा लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आजी-आजोबांची भन्नाट गोष्ट

 

फेब्रुवारी सुरू झाला की सगळीकडेच गुलाबी वातावरण तयार होते. उत्सुकता असते ती म्हणजे व्हॅलेंटाईन डेची , सगळेजण आपल्या भावना जोडीदाराला सांगण्यासाठी उत्सुक असतात.

या दिवसांची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पहायला मिळत असते. पण तुम्हाला ही गोष्ट माहितीये का? की प्रेमाला वय नसतं. आजची ही गोष्ट पण अशीच काहीशी आहे.

आपण नेहमीच तरुण तरुणींना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना बघतो, पण पुण्यात राहणाऱ्या अनिल यार्दी आणि आसावरी कुलकर्णी हे दोघेही ६९ वर्षांचे असून ते लिव्ह इन रिलेशनशिप राहत आहे.

गेल्या सहा वर्षांपासून ते लग्नशिवाय सहजीवन आनंदाने राहत आहे. लग्नाच्या कटू अनुभवामुळे आसावरी यांचा विश्वास उडाला होता. त्यानंतर अनिल यार्दी यांनी आसावरी यांना सामंजस्याची साथ दिली आहे.

आसावरी या एलआयसीमध्ये नोकरी कर होत्या. १९७४ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पुढच्यावर्षी त्यांना मुलगा झाला, पण वैवाहिक नात्यातला विसंवाद त्यांना त्रासदायक ठरू लागला. त्यामुळे त्यांनी या बंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, घटस्फोट झाला.

मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे गेला होता. त्यानंतर त्यांच्या पतीने दुसरे लग्न केले, मुलगा अधूनमधून भेटायला यायचा. पुढे आसावरी यांनी दुसरे पुनर्विवाह केला पण १९९७ मध्ये त्यांचा पतीचे निधन झाले. त्यामुळे काही काळानंतर त्या एकट्या पडल्या होत्या.

आसावरी निवृत्त झाल्यानंतर त्यांना पुण्यातल्या हॅपी सिनियर्स या मंडळाची माहिती मिळाली. एकटं राहणाऱ्या जेष्ठांसाठी लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय त्यांना खूप भावला आणि त्यानंतर त्यांनी या मंडळाशी संपर्क साधला होता.

अशात अनिल यांची स्टोरी एकदम सरळ आहे. यार्दी हे एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर होते. त्यांना एक मुलगी होती. त्यांच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर २०१३ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर ते एकटे पडले होते. मग यांनी हॅपी सिनियर्सशी संपर्क साधला आणि ते आसावरी यांना भेटले.

सुरुवातीला त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि त्यांच्या आवडी निवडी जुळू लागल्या. त्यानंतर त्यांच्यातले प्रेम वाढत गेले आणि सात आठ महिन्यांनंतर त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचे ठरवले. यार्दी यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने आसावरी यांचे घर सोयीस्कर होते, त्यामुळे यार्दी आसावरी यांचे घरी राहायला आले.

आता गेल्या सहावर्षांपासून दोघे लिव्ह इनमध्ये राहत आहे. ते दोघेही लांबलांब प्रवास करतात. नाटकं, चित्रपट बघतात. खर्चाचे वाटप समान होईल याची काळजी दोघेही घेत असतात. कधी कधी खटकेही उडतात पण त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम आणि आदर नेहमीच दिसून येतो.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गाईच्या दूध खरेदी दरात वाढ

लोकांना वाटतं गडकरी जवळ हरामचा माल आहे,म्हणून इथून पुढं…..

शेतकऱ्यांना शेण आणि सेंद्रीय कचऱ्यापासून मिळणार पैसे; वाचा काय आहे सरकारची योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.