महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. यादरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं आहे. हैदराबादमध्ये नमाजानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी भाषणादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांना रडू कोसळलं.( Asaduddin Owaisi burst into tears during the speech)
हैदराबादमध्ये भाषणादरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “खरगोनमध्ये मुस्लिमांची घरे उद्ध्वस्त झाली. जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला. मुस्लिम लोकांवर अत्याचार झाले. या हिंसाचारादरम्यान मुस्लिम लोकांची दुकाने उध्वस्थ करण्यात आली, यामुळे मला खूप दुःख झालं आहे. आम्ही कदापि असे अत्याचार सहन करणार नाही.”
“आम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही. तुमच्या अत्याचाराला आम्ही बळी पडणार नाही. तुमचे सरकारही आम्हाला घाबरवू शकत नाही. आम्ही संयमाने काम करू, पण आम्ही मैदान सोडणार नाही”, असे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत. देशात सध्या एका समुदायाला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
यावेळी भाषण करत असताना एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे डोळे पाणावले होते. अल्पसंख्याक समाजावर सरकारकडून होत असलेल्या कारवाईमुळे असदुद्दीन ओवेसी संतापले होते. “कोणालाही निराश होण्याची गरज नाही, चढ-उतार येत असतात. पण आपल्याला प्रत्येक आव्हानाला खंबीरपणे सामोरे जावे लागणार आहे”, असे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी भाषणात म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यावेळी दोन समाजाच्या गटांमध्ये हिंसाचार उसळला होता. यानंतर प्रशासनाने हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे बुलडोझरच्या साहाय्याने हटवण्यात आली होती.
यावरून एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले होते. एका विशिष्ट समाजावर बुलडोझरची कारवाई केली जात आहे, असा आरोप एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता. केवळ एका समाजावर कारवाई केली जात आहे, ही भाजपची फुटीर रणनीती आहे, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला
ज्योतिष अभ्यासकांची देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘२०२३ नंतर सत्तेच्या जवळ…’
‘या’ चित्रपटाची शुटींग पुर्ण होईपर्यंत अनेक कलाकारांचा झाला मृत्यु, २३ वर्षांनी झाला होता प्रदर्शित