नवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून धक्का बसेल

नवी दिल्ली। संसार म्हटलं तर नवरा बायकोचे वाद हे होतचं असतात. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या दोघांच्यात वादाची आग पेटत असते. मात्र काही काळानंतर या दोघांमधील वाद मिटतो. पण नवरा बायकोच्या आयुष्यात असे काही खास दिवस असतात जे कायम लक्षात राहणारे असतात.

त्यात एकमेकांचे वाढदिवस असो, एखादा घरातील कार्यक्रम असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो हे दिवस दोघांच्या लक्षात राहणारे असतात. त्यामुळे या दिवशी एकमेकांना खुश ठेवण्याचा हे प्रयत्न दोघे करत असतात. मात्र सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात चक्क नवरा बायकोचा बर्थ डे विसरला.

त्यामुळे यांच्यात वाद झाला व बायकोने चक्क नातं तोडण्याचाच निर्णय घेतला. ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही मात्र हा संपूर्ण प्रकार आग्र्यामधून समोर आला आहे.

आग्र्यात राहणारं हे दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. महिला पीएचडी करते आहे. तर तिचा नवरा कॉलेजमध्ये अकाऊंटट आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या छोटेमोठे वाद होतंच होते. पण बायकोच्या वाढदिवशी वाद थेट नातं तोडण्यापर्यंत गेले.

या दोघांमध्ये आधीपासूनच छोटे मोठे वाद होत होते. अशातच नवऱ्याने आपल्याला बर्थ डे विश केलं नाही म्हणून बायको नाराज झाली. यानंतर तिने त्याच्यासोबत राहण्यासच नकार दिला. नवऱ्याने हात जोडून माफी मागितली. नातं तोडू नको म्हणून विनवणी केली. मात्र बायकोनं न ऐकता नवऱ्याविरोधात तिने तक्रार केली.

या महिलेनं तक्रार केल्यानंतर तीन वर्षातील भांडणाची लिस्ट काढली आहे. नवरा कोणतंही काम आईवडिलांना विचारल्याशिवाय करत नाही याचा तिला राग होता. त्यामुळे रोजच्या भांडणाला नवरा वैतागलेला होता. त्यात बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरला आणि त्याची इतकी मोठी शिक्षा त्याला मिळाली.

या दाम्पत्याला कुटुंबाने प्रचंड समजवण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापही या दाम्पत्याली वाद मिटलेला नाही. त्यांना आता समुपदेशनासाठी तारीख देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाणी कामगिरी
…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची मिरवणूक, पाहा व्हिडिओ
MPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षेचं आयोजन 
शाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना? जाणून घ्या ‘या’ पदार्थांमध्ये आहे मांसाहारी घटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.