Share

Silver rain : घराची भिंत पाडताच पडला चांदीच्या नाण्यांचा पाऊस, खजिना लुटण्यासाठी गावकऱ्यांची तुफान गर्दी

up

Silver rain : भारतामध्ये जमिनीखाली खजिना मिळाल्याचा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. त्याबाबतच्या बातम्याही येत असतात. भिंतीमध्ये दडलेल्या खजिन्याबद्दलही तुम्ही ऐकले असेल, आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये घडली आहे.(Rain of treasure, badau, bulldozer, silver coins)

भिंत फोडून काढताच त्या ठिकाणी चांदीच्या नाण्यांचा पाऊस पडल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. बदाऊ येथील एक मोडकळीस आलेले घर पाडण्यासाठी बुलडोझर चालवण्यात आले होते. पण त्यानंतर असे काही झाले की ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.

पालिकेने जेव्हा बुलडोझरने हे पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठ्या प्रमाणात चांदीचे नाणे त्या भिंतीतून पडू लागले. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी ही नाणी लुटण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे तिथे गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे संपुर्ण देशभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सततच्या पावसामुळे हे जुने घर कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. घरामुळे दुर्घटनाही घडू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने या घराला पाडण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी भिंत पाडली असता तेथे चांदीचे नाणे आढळल्याचे समोर आले.

एका नाण्याचे वजन सुमारे १० ग्रॅम असून बाजारात त्याची किंमत एक हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, या भिंतीतून १६० हून अधिक चांदीची नाणी बाहेर आली आहेत. या घटनेबाबत स्थानिक लोकांमध्ये जोरात चर्चा सुरू असून लोक वेगवेगळे अंदाजही लावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रशासनाने चांदीची नाणी जमा केली आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घराला नाकाबंदी करण्यात आली. जी घरे जीर्ण अवस्थेत आहेत, अशी घरे अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडू नये म्हणून ती पाडली जात आहे.

महत्वाच्या बातम्या
”सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून त्याचे नाव BCCI च्या अध्यक्षपदाच्या यादीतून वगळले”
engineering : इंग्रजीला घाबरायची गरज नाही, आता इंजिनीयरींगचे शिक्षणही मराठीतून मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Shivsena : एकच पक्ष मात्र ७ आमदारकीच्या निवडणूंकासाठी ७ वेगळी चिन्ह, तरी एकदाही पराभव नाही; वाचा पुरंदरच्या धुरंधराबद्दल…

ताज्या बातम्या आर्थिक इतर

Join WhatsApp

Join Now