पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघातून भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. चिंचवड मतदारसंघातून अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
त्याचबरोबर महाविकास आघाडीनेही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसच्या वतीने कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल कलाटे यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आपल्या पक्षातील इच्छुक असलेल्यांनाच उमेदवारी द्यावी, अन्यथा या निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतल्याची माहिती पुढे येत आहे. चिंचवडच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून सध्या मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
चिंचवड जागेसाठी राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांचे नाव पुढे आणले आहे. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा विरोध आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या पैकी कुणालाही एकाला पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी भूमिका घेतल्याने चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण राहूल कलाटे हे अपक्ष आहेत. ते राष्ट्रवादीचे सदस्यही नाहीत.
राहूल कलाटेंनी मागच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवारी केली होती. तर त्याआधी त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकी लढवली होती. तसेच ते शिवसेनेकडून नगरसेवकही होते. त्यामुळे शिवसेनेकडूनही त्यांना साथ मिळेल का हे पहावे लागेल.
आता अजितदादा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांपुढे झुकून उमेदवार बदलतात की राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांचा आदेश पाळावा लागतो याकडे लक्ष लागले आहे. पण लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणारी ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या
शरद पवारांमुळेच मुख्यमंत्रीपद हातातून गेले; अजित पवार स्पष्टच बोलले, थेट काकांची चूकच दाखवली
गौतम अदानींना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, थेट शेअर मार्केटमधूनच झाली हकालपट्टी
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, एका झटक्यात तुमची वर्दी उतरवेल..’; पोलिस स्टेशनमध्ये दारू पिऊन राडा