Share

पृथ्वी मोठ्या संकटात! ८२ तासांत मिळाले तब्बल १८०० सिग्नल; शास्रज्ञांना वाटतेय ‘ही’ भिती

अंतराळात आकाशगंगेतून पृथ्वीवर येणा-या सिग्नलने शास्त्रज्ञांना थक्क केले आहे. हे सिग्नल रेकॉर्ड केले जातात. शास्त्रज्ञ म्हणतात की हे सामान्य वेगवान रेडिओ स्फोटांपेक्षा वेगळे आहेत. शास्त्रज्ञ रेडिओ दुर्बिणीद्वारे सिग्नलच्या दिशेने 91 तास निरीक्षण करत आहेत. त्यांनी 82 तासांत 1863 सिग्नल्स रेकॉर्ड केले.

काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे सिग्नल बाहेरील जगातील एलियन कडून असू शकतात. हे सिग्नल चीनच्या फाइल हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपने टिपले आहेत. ज्या ठिकाणाहून सिग्नल येत आहेत त्या ठिकाणाचे नाव FRB 20201124-A असल्याचे सांगितले जाते.

या सिग्नल्सचा अभ्यास करणाऱ्या चीनमधील एका विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ हेंग शू यांनी सांगितले की, त्या आकाशगंगेमध्ये एक न्यूट्रॉन तारा आहे, जो हा रेडिओ सिग्नल पाठवत आहे. त्यात खूप उच्च चुंबकीय क्षेत्र असू शकते. अमेरिका आणि चीनचे शास्त्रज्ञ संयुक्तपणे या गूढ संकेतांचा अभ्यास करत आहेत.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अवकाशातून वारंवार सिग्नल मिळत आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे स्त्रोत सिग्नल पाठवण्याबरोबरच फिरतही आहे. म्हणजेच ते त्रिमितीय अवकाशात प्रकाशाचे किरण पाठवत आहे. शास्त्रज्ञही या किरणांचा अभ्यास करत आहेत.

लास वेगासमधील नेवाडा विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ बिंग झांग यांनी सांगितले की, हे रेडिओ सिग्नल्स आपल्या कल्पनेपेक्षा अधिक रहस्यमय आहेत. तिथून वेगवेगळ्या तरंगलांबीचे सिग्नल मिळत आहेत. हे दुसऱ्या जगातून आलेले संदेशही असू शकतात. त्यांना समजून घेणे खूप कठीण आहे.

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now