एक-दोन नव्हे तर तब्बल १६ तरूणांना महिलेने घातला गंडा; तपासादरम्यान पोलिसही चक्रावले

सोशल मीडियावर मैत्री करून जाळ्यात अडकवण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. सोशल मिडीयावर बनावट अकाऊंट उघडून  तरूणीने पैशावाल्या मुलांना प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीने तब्बल 16 तरुणांना आता पर्यंत फसवलं आहे आणि त्यांच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करत त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील पैसे घेऊन पसार होत असत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणाला हॉटेल  रूममध्ये तरूणीने भेटायला बोलावले होते. त्याला तरुणीने गुंगीचं औषध देऊन त्याच्याकडील रोख रक्कम, सोन्याची चैन लूटले असल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा बारकाईने तपास करत एका 27 वर्षीय तरुणीला अटक केली आहे.

सायली काळे असं त्या तरुणीचं नाव आहे. ती डेटिंग ऍपवर तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आणि त्यांना भेटायला बोलवून त्यांच्याकडील पैसे, दागिने घेऊन पसार होत.

सायली डेटिंग ऍपवर अकाऊंट उघडून शिकार शोधत आणि त्यानंतर तिचे काम झालं की ते अकाऊंट डिलिट करत. पण पोलिसांनी तिचाच गेम तिच्यावर पलटवला आणि ती यात अलगद अडकली.

तरुणीकडे 15 लाखांचे महागडे गिफ्ट्स

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत राहणारी सायली काळे हिच्या घराची पोलिसांनी जेव्हा झडती घेतली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्याकडे तब्ब्ल 15 लाख किंमतीचे सोन्याचे दागिने, महागडे फोन, गिफ्ट्स सापडले आहेत. दरम्यान तिने आणखी किती जणांना फसवले आहे याचाही तपास पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शेतजमिनी नावावर करून घेण्यासाठी आता लागणार फक्त १०० रुपये, जाणून घ्या कसे …
‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र…’
‘शर्जील उस्मानीच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणा’, फडणवीसांचे ठाकरे सरकारला अल्टिमेटम
‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.