Share

अभिनयात यश मिळाले नाही म्हणून सरफराज करतोय ‘हे’ काम, वडील कादर खान यांचे नाव केले रोशन

सरफराज

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कादर खान(Kadar Khan) यांचा मुलगा सरफराज खान(Sarfaraz Khan) याचा जन्म २२ एप्रिल १९७६ रोजी झाला. आज तो आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. सरफराजने त्याच्या आवडीमुळे अभिनयात हात आजमावला आणि त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले.(as-he-did-not-get-any-success-in-acting-sarfaraz-is-doing-this-work)

त्याला ते यश मिळाले नसले तरी तो अजूनही अभिनय जगताशी जोडला गेला आहे आणि आपल्या वडिलांचे नाव अभिमानाने उंचावत आहे. सरफराजलाही लहानपणापासूनच घरातील अभिनयाच्या वातावरणामुळे अभिनयाच्या दुनियेत आपलं करिअर करायचं होतं, पण कादर खानला आपल्या मुलाने अभिनय करावा हे पसंत नव्हतं.

त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे जेव्हा सरफराजने आपले शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्याने आपल्या वडिलांना या स्वप्नाबद्दल सांगितले, परंतु वडिलांनी नकार दिला. सरफराज लहानपणापासून अभिनय जगत बघत मोठा झाला होता, त्यामुळे त्याने बॉलिवूडमध्येच पदार्पण केले.

सरफराजने तेरे नाम, मैने तुझको दिल दिया, मिलेंगे मिलेंगे, शतरंज, राधे, रमैया वस्तावैया, वाँटेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सरफराज दिसला आहे, पण बहुतेक त्याला सहाय्यक अभिनेता किंवा नकारात्मक व्यक्तिरेखा मिळाली आणि त्यामुळेच मुख्य नायक म्हणून तो आपली भूमिका साकारू शकला नाही.

अभिनयाच्या जगात तितकेसे यशस्वी नव्हते, परंतु सर्फराजने आपल्या अपयशाने निराश झाले नाही. सरफराज मोठ्या पडद्यावर हिट ठरला नसला तरी त्याने थिएटरमध्ये खूप नाव कमावले आहे. , ‘ताश के पट्टा’, ‘लोकल ट्रेन’, ‘बडी दीर की मेहेरबान आते आते’ अशा अनेक नाटकांमधून सरफराज खान हे नाट्यविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. तो स्वतःची अभिनय एकेडमी देखील चालवतो, ज्यामध्ये तो नवीन मुला-मुलींसाठी एक्टिंग वर्कशॉप घेतो. याशिवाय तो अनेक प्रोडक्शन कंपन्याही चालवतो.

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now