आर्यन नीट जेवत नाही, बॅरेकमध्ये रडत बसतो, वॉशरूमलाही जात नाही, जेल स्टाफला त्याची चिंता

शाहरुख खानचे घर ‘मन्नत’ला स्वर्गच म्हणावे लागेल कारण याची किंमत सुमारे 350 कोटी रुपये आहे. शाहरुख खानचे हे घर म्हणजे वांद्र्याच्या बँडस्टँडवरचे सौंदर्य आहे, जे पाहिले नाही तर त्यांची मुंबईची सहल अपूर्ण राहिली असे लोकांना वाटते. यात अनेक आलिशान सुविधा आहेत जसे की लिव्हिंग रूम, लायब्ररी, बेडरूम, प्ले एरिया, प्रायव्हेट बार, स्विमिंग पूल.

या ‘मन्नत’मध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या आर्यन खानला आज जेलमध्ये दिवस काढावे लागत आहेत. आर्यन तुरुंगात रडत राहतो आणि त्याने खाणे पिणे टाळले आहे. एवढंच काय तर तो वॉशरूमला जाण्यासाठीसुद्धा टाळाटाळ करतो अशी माहिती मिळाली आहे.

शाहरुखचा लाडका आर्यन खान सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. 23 वर्षीय आर्यन खानच्या कारागृहातील काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कारागृहात आर्यनच्या जवळ राहणाऱ्या काही कैद्यांनी त्याला रडताना पाहिल्याचे सांगितले आहे. आर्यन जेलच्या कोठडीत बसून रडत असल्याची माहिती एका कैद्याने दिली आहे.

एवढेच नाही तर तुरुंगातील कर्मचारी आर्यनच्या आरोग्याबाबत आणि स्वच्छतेबाबत चिंतेत असल्याचेही वृत्त आहे. असे सांगण्यात आले आहे की आर्यनला तुरुंगाचे जेवण आवडत नाही, तो तिथले पाणी व्यवस्थित पित नाही. अशीही माहिती मिळाली आहे की आर्यन खान स्वच्छतेच्या समस्येमुळे जेलमधील वॉशरूमला जाण्यासाठी टाळाटाळ करत आहे.

आर्यन खान स्टार किड असल्याने येथे कोणतीही विशेष सुविधा देण्यात आली नसल्याची माहिती आधी देण्यात आली होती. आर्यनला तुरुंगात तोच दिनक्रम पाळावा लागतो जो इतर कैद्यांना लागू होतो. त्याला इतर कैद्यांसह खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते.

मात्र, जर त्याला कॅन्टीनमधून काही वेगळे खायचे असेल तर त्याला ते स्वतःच्या पैशाने खरेदी करण्याची सोय आहे, त्यासाठी घरातून त्याला ४५०० ची मनीऑर्डर मिळते. अलीकडे शाहरुख खानने त्याला 4500 रुपये पाठवले. आर्यन तिथे बिस्किटे खाऊन आपले दिवस काढत असल्याचे बोलले जात होते.

महत्वाच्या बातम्या
राकेश झुनझुनवालांनी मोदींची तुलना केली बायकोशी, म्हणाले सुहागरात्रीला..; व्हिडीओ तुफान व्हायरल
‘या’ भीतीमुळे आईने कादर खानला काबुलहून मुंबईत आणले, गरिबी इतकी की मशिदीसमोर मागायचे भीक
घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने पूर्ण केले तिचे स्वर्गात जाण्याचे स्वप्न, सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती
घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने पूर्ण केले तिचे स्वर्गात जाण्याचे स्वप्न, सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.