आर्या आंबेकरचा मोठा खुलासा, प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडले मौन..

मुंबई । सर्व अभिनेत्रींच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता अगदी कमी वयात मोठ्या उंचीवर गेलेली अभिनेत्री आर्या आंबेकरने मोठे नाव कमवले आहे. सारेगमप लिटिल चॅम्प शोमध्ये तिने भाग घेतला आणि तिच्या आवाजाने सर्वांना वेडे केले. लिटिल चॅम्प नंतर देखील तिने अनेक स्टेज शो मधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

तिने मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. ती सध्या काय करते ह्या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती. तिने एक मोठा खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध गायकाला आर्या डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सध्या सुरू आहे. यामुळे चाहत्यांना याची उत्सुकता लागली होती.

याबाबत ती म्हणाली, मी सोशिअल मीडियावर अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह आहे. माझे फॉलोवर्स हे ऑरगॅनिक आहेत. फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूब ह्यांना मी कधीही पे केलेलं नाही. फॉलोअर्स, सबस्क्रायबर विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. मी पुर्णपणे त्याच्या विरोधात आहे आणि ते माझ्या नैतिकतेत बसत नाही.

तसेच ती म्हणाली, मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत आहे, अशी चर्चा अनेकदा दिसते. मी परत सांगू इच्छिते कि ती व्यक्ती माझे मार्गदर्शक आहेत. मी नेहमीच त्यांचा आदर करते आणि पुढे देखील करत राहील आणि मला त्यांचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे, असेही तिने कबूल केले आहे.

सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवलेल्या पाहायला मिळतात पण त्यांना किती प्राधान्य द्यायचे हे नेटकाऱ्यानी समजून घेतले पाहिजे. यामुळे आता तरी या चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी आशा आहे. यामुळे अनेकजण एखाद्या चांगल्या नात्याचा वेगळा अर्थ काढतात.

सोशल मीडियावर आपण बघत असतो की अनेकदा कोणाबरोबरही नावे जोडली जातात. यामुळे वेगवेगळे अर्थ निघत जातात. यामुळे त्याची वेगळीच चर्चा रंगते. आता मात्र आर्या आंबेकरने यावर खुलासा केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.