Arvind Sawant: पुण्यात झालेल्या अतिववृष्टीमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. याविषयी बोलताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याला ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात झालेल्या जोरदार पावसाबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही. पुण्यात गेल्या दहा वर्षाचा रेकॉर्ड मोडून चोवीस तासात भरपूर पाऊस पडला आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता अरविंद सावंत यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, पुण्यातल्या पावसावर उपमुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं? पाऊस काय आमच्या कंट्रोलमध्ये असतो का? मग मुंबईत कुणाच्या कंट्रोलमध्ये असतो? तेव्हा तमाशा करता का? असा खोचक सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ती नाची कुठे आहे ते शोधतोय मी सध्या. मुंबईतल्या खड्ड्यात नाचत होती ती नाची पुण्यात कशी नाही गेली? नागपूरला का नाचायला गेली नाही? हा खरा प्रश्न आहे, असे सावंत यावेळी म्हणाले. तसेच महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार अशा मूलभूत प्रश्नांकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
दिवाळीनिमित्त राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत चार वस्तू देण्याची घोषणा केली होती. यावरही अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, १०० रुपयांत चार वस्तू देण्याची घोषणा करून गरिबांची चेष्टा केली. लोकं रेशनच्या दुकानात जाऊन जाऊन कंटाळले परंतु, अजूनही कुठल्याही दुकानात त्यांना ते सापडत नाही आहे, असे ते म्हणाले.
तसेच सगळं काही पोकळ आहे. मुळातच बेकायदेशीर सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करता येईल? ते घोषणा देण्यामध्ये मास्टर आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, पण लोकांचं पोट भरण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाच विचार नाही, असेही अरविंद सावंत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
ठाकरे गट : शेवट शिवसैनिकांनी बदला सूचनाच; बंदखोरांना गावागावात घेरलं अन् पडलं तोंडघशी
कोल्हापूर : …मग तेव्हा भाजपने भाजपची संस्कृती जपली नाही’; कोपुरची वाघीन कडाडली
तेलंगणा: चेकपोस्टवर भाजपा नेत्याच्या कारल्हा बहुमताने नोटांची रास; विचारणा केली…