केंद्र सरकारची कपटनिती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे, तसेच रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुडवडा निर्माण झाला आहे.

अशा संकट काळात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हे आमने सामने आले आहे. राज्य सरकारच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर आरोप केले जात आहे. आता शिवसेना खासदार अरिविंद सावंत यांनी एक गंभीर आरोप केंदावर केला आहे.

देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रुर आणि कपटनितीचे राजकारण खेळत आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने अजूनही फिरवत ठेवले आहे, असा गंभीर आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत त्यावेळी त्यांनी हे म्हटले आहे.

केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्सप्रेस येण्यासाठी विलंब होत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस १९ तारखेला निघाली, तरी अजून अजून काल रात्री २४ तासानंतर ती अकोला स्टेशनवर होती. आता ही ट्रेन रायपुर जवळ आहे, म्हणजे गाडीला जायचंय विशाखापट्टणमला आहे आणि ती फिरतेय कुठे माहित नाही, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

तसेच या रेल्वेला ग्रीन कॉरीडोअर उपलब्ध करुन दिले जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण तसे होताना दिसत नाही. ही क्रुर आणि कपटनिती आहे. त्यामुळे याप्रकरणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘माझी मम्मी फडफड कोंबडीवाणी मेली’; रुग्णालयाबाहेर काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
सावधान! कोरोनापासून बचावासाठी करण्यात येणारे ‘हे’ घरगुती उपाय ठरताहेत घातक
‘कदाचित ही शेवटची शुभसकाळ’; कोरोनाने मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळ्यातून पाणी आणणारी पोस्ट 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.