इंडिअन आयडल १२: अरुणीता कांजीलालनं गायलं राणू मंडलचं गाणं, हिमेश रेशमियाला झाले अश्रू अनावर

‘इंडिअन आयडल १२’ हा शो सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या शो विषयी सोशल मिडीयावर वेगवेगळी टीका होताना दिसत आहे. या शोवर आणि निर्मात्यांवर वेगवेगळे आरोप होताना पाहायला मिळाले.

शोचा पुढील भाग हिमेश रेशमिया स्पेसिअल असणार आहे. तसेच पुढील भागात नेहा कक्करची बहिण सोनू कक्कर हिला स्पेसिअल गेस्ट म्हणून बोलावण्यात आले आहे. या भागात सर्वच स्पर्धक हिमेश रेशमिया यांच्या गाण्यावर परफॉर्म करताना पाहायला मिळतील.

याच हिमेश रेशमिया स्पेसिअल भागामध्ये स्पर्धक अरुणीता कांजीलाल राणू मंडलने गायलेले गाणे ‘तेरी मेरी कहाणी’ या गाण्यावर परफॉर्म करताना पाहायला मिळेल. शूट दरम्यान तिच्या या गाण्यावरील परफॉर्ममुळे जमलेले सर्वजण चकित झाले. तसेच तिचा हा परफॉर्मन्स पाहून सर्वाना राणू मंडलची आठवण झाली.

तिच्या या गाण्यावर परीक्षक हिमेशरेशमिया तर थक्क झाले होते. त्याने तिच्या या परफॉर्मन्सला कमेंट देताना म्हटले की हे पूर्ण गाणे फिमेलचे नाही. पण टू माइंडब्लोइग गायले आहे. अरुनिताचे गाणे ऐकून हिमेशच नाही तर अनु मलिक देखील इंप्रेसझालेले पाहायला मिळतात.

तर येत्या भागात सायली कांबळेने ‘क्योकी इतना प्यार तुमको करते है सनम’ या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तिचे हे गाणे ऐकून सर्वच जण भावूक झाले. तर हिमेश रेशमिया यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी तिचे गाणे मनाला भिडले अशी कमेंट केली.

‘इंडिअन आयडल १२’ शो सतत वादाच्या भोवऱ्यात असला तरी त्याचे चाहते आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. स्पर्धकांनी आपल्या आवाजाने अनेकांची मने जिंकली आहे. तसेच शुटींग व्यतिरिक्त ते सर्वजण खूप धमाल मस्ती करताना पाहायला मिळतात.

हे ही वाचा-

काय सांगता! चोराच्या घरावरच डल्ला, ८ कोटीचे समान चोरी होऊनही तक्रार नाही

अभिनेत्री रेखा शारीरीक संबंधावर असे काही म्हणाल्या की, लोकांनी दिल्या शिव्या

आता कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी सोनू सूद मैदानात, हात जोडून केले हे आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.