‘पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही’; अरुंधती रॉय यांनी भाजप आणि संघावर डागली तोफ

पुणे |  डिसेंबर २०१७ मध्ये शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली होती. मात्र या परिषदेनंतर कोरेगाव-भीमा येथे मोठी दंगळ उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडला गेला. यानंतर ३० जानेवारीला (शनिवारी) पुण्यात एल्गार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना आंतराष्ट्रीय लेखिका अरुंधती रॉय यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची तोफ डागली आहे.

एल्गार परिषदेत आंतरराष्ट्रीय लेखिका अरुंधती रॉय बोलत होत्या. ‘ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही व पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात ‘एल्गार’ करण्याची गरज असून ‘पेशवाई गेली’ मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रुपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे’. असं वक्तव्य रॉय यांनी केले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘मोदीजी काँग्रेसच्या वंशवादावर बोलताना दमत नाहीत. मात्र अंबानी, अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणेशाहीला सढळ मदत करतात. त्यामुळे कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला. त्यामुळे भारतातील श्रीमंतांच्या संपत्ती कमालीची वाढ झाली आहे. सर्व सुविधा कॉर्पोरेट वर्गाकडे एकवटल्या आहेत’.

अरुंधती रॉय यांनी देशातील अनेक घडामोडींवर एल्गार परिषदेत भाष्य केले. मुस्लिमांची कत्तल हा त्यांचाच अपराध असे चित्र निर्माण केले जात आहे. तसेच एल्गार परिषद सविधानविरोधी काम करणारी नाही. शहरातील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार, लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही. एकविसाव्या शतकात संघ ब्राम्हणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्या हातात आहे, ज्यांचे गोमुत्र हे आवडीचे औषध आहे. अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पोलिसांनी ३० जानेवारीला एल्गार परिषद घेण्याची परवानगी दिली होती. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. तसेच अरुंधती रॉय, कन्नन गोपीनाथन, विद्यर्थी नेता शर्जील उस्मानी आणि पत्रकार प्रशांत कनोजिया यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या-
‘हिंदू समाज सडलेला आहे’, एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीचे वादग्रस्त वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल
कोरोनाकाळात पाच महीने घरी बसूनही तुम्हाला पगार दिला, आता जरा दुसऱ्यांच्या वेदनांचा विचार करा
नाश्त्याला चहा चपाती खाण्याची चूक करताय तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
बॉलिवूडमध्ये टिकून राहणं फार अवघड….; पहा खिलाडी अक्षय कुमार काय म्हणतोय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.