विवाहीत असूनही अरुणा इराणीने आई न होण्याचा निर्णय घेतला होता; कारण ऐकून थक्क व्हाल

बॉलीवूड अभिनेत्री अरुणा इरानीने त्यांच्या काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि डान्सचे लाखो दिवाने होते. आजही लोकं त्यांच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे कौतूक करत असतात. त्यांनी निभावलेली प्रत्येक भुमिका खुप खास होती.

अरुणा इरानीने त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांनी निभावलेली प्रत्येक भुमिका जिवंत केली होती. त्यांनी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री, खलनायिका, सासूची भुमिका, आईची भुमिका अशा वेगवेगळ्या भुमिका साकारल्या. त्यांच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी खुप पसंत केले.

चित्रपट मुख्य अभिनेत्याशिवाय पुर्ण होत नाही. तसेच तो खलनायिकेशिवाय देखील पुर्ण होत नाही. अरुणा इराणीला बॉलीवूडच्या प्रसिद्ध खलनायिकांमध्ये गणले जाते. अरुणा इराणीचा जन्म १८ ऑगस्ट १९४८ ला मुंबईत झाला होता. आठ भाऊ बहीणींमध्ये अरुणा सर्वात मोठ्या होत्या.

पाचवीपर्यंत शिकल्यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण सोडले होते. कारण त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती नीट नव्हती. वयाच्या पंधराव्या वर्षी गंगा जमूना चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. अभिनया क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीले नाही.

हिंदीसोबतच त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी गुजाराती अशा भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये आई, बहीण, सासू, सुन अशा वेगवेगळ्या भुमिका केल्या. पण त्यांना सर्वात जास्त पसंत केले गेले ते म्हणजे खलनायिकेच्या भुमिकेत.

बॉलीवूडच्या सर्वात भयानक खलनायिका म्हणून अरुणा इराणीला ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या उत्तम अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्याल आले होते.

एक काळ असा होता जेव्हा अरुणा इराणी आणि अभिनेते मेहमूदच्या अफेअरच्या चर्चा बॉलीवूडमध्ये होत होत्या. पण त्या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. मेहमूद आणि अरुणाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

असे बोलले जात होते की, दोघांनी लपून लग्न केले होते. पण त्या दोघांनी कधीच या गोष्टीचा स्वीकार केला नाही. एका मुलाखतीमध्ये अरुणा म्हणाल्या होत्या की, ‘मी आणि मेहमूद खुप चांगले मित्र होतो. आमचे नातं खुप वेगळे होते. पण आम्ही दोघांनी कधी लग्न केले नाही’.

अनेक चित्रपटांमध्ये काम करुन अरुणा इरानीने एक वेगळी ओळख निर्माण केली हती. त्या त्यांच्या करिअरमध्ये खुप व्यस्त होत्या. म्हणून त्यांनी ४० वर्षांच्या होईपर्यंत लग्न केले नाही. १९९० मध्ये त्यीं दिग्दर्शक कुक्कू कोहलीसोबत लग्न केले. कुक्कू कोहली विवाहीत होते. त्यांना मुलं देखील होती.

ही गोष्ट अरुणा यांना माहीती होती. पतीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, ‘आमची भेट झाली तेव्हा आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. पण नंतर मात्र आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी हे लग्न करुन खुप आनंदी आहे’. लग्नाला अनेक वर्ष झाली तरी अरुणा अजून आई झाल्या नाहीत.

आपल्या आई होण्यावर अरुणा म्हणाल्या होत्या की, ‘आई होणे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही ते स्वप्न होते. पण हे स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही. कारण माझे लग्न झाले त्यावेळी माझे वय ४० वर्ष होते. आई होण्यासाठी हे वय खुप अधिक आहे. मी आई झाले असते तर माझ्या मुलामध्ये आणि माझ्यात खुप जास्त अतंर राहीलं असत. ही गोष्ट खुप अवघड झाली असती. म्हणून मी लग्नानंतर आई न होण्याचा निर्णय घेतला’.

अरुणा इराणी आत्ता ७५ वर्षांच्या आहेत. त्या त्यांच्या पतीसोबत मुंबईमध्ये राहतात. मोठ्या पडद्यावरुन गायब असल्या तरी अरुणा इराणी छोट्या पडद्यावर कार्यरत आहेत. त्या मालिकांमध्ये भुमिका साकारताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

सैफच्या बेडरुममधील ‘या’ वाईट सवयीला वैतागली आहे; करिना म्हणाली, मी झोपलेली असतानाही तो मला…

इशा केसकरच्या बिकनीतील फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा फोटो

वरुण धवनची बायको आहे यशस्वी बिजनेस वूमन; जाणून घ्या नताशा दलालबद्दल काही रोचक गोष्टी

पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.